मुंबई APMC संचालक मंडळ व्हेंटिलेटरवर!
मुंबई APMC संचालक मंडळ व्हेंटिलेटरवर!
- मुंबई APMC ४ अपात्र संचालकांना उच्च न्यायालयाचा दिलासा
- १८ संचालकांपैकी १४ संचालकाची शासन दरवारी आणि कोर्टात सुनावली सुरु आहे
- विकास कामासाठी पैसे कुठून येणार!
- बाजार समितीवर संचालकाची ग्रहण !
- या ग्रहणापासून   आम्हाला मुक्त करा बाजार घटकांची मागणी
नवी मुंबई : मुंबई APMC सह सहा विभागातून निवडून आलेल्या १८ संचालकांपैकी ७ संचालकांचे पद रद्द झाले होते.   त्याबाबत पणन संचालक तथा मुख्यमंत्र्यांकडे सुनावणी होईपर्यंत अपात्र संचालकांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. परंतु मागील महिन्यात जानेवारीमध्ये पणन मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावणी घेऊन निर्णय राखून ठेवला . तसेच नवीन सभापती ,उपसभापती निवडणुकीसाठी स्थगिती दिली होती.निर्णय न दिल्याने पणनमंत्रयाच्या विरोधात अपात्र संचालकांनी न्यायालयातही याचिका दाखल केली होती.त्याबाबत बुधवारी न्यायालयाने माधवराव जाधव , बाळासाहेब सोळसकर , प्रभू पाटील,जयदत्त होळकर,   या ४ अपात्र संचालकांना दोन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्याचबरोबर पणनमंत्र्यांना येत्या ६ आठवड्यामध्ये याबाबत निर्णय देण्याच्या सूचना केल्या आहेत. तोपर्यंत दोन आठवडे आणखीन अंमलबजावणीसाठी लागणारा असल्याने चार अपात्र संचालकांना ८ आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे एपीएमसीतील संचालक मंडळाचे कोरम पूर्ण होत असून या दोन महिन्यांपर्यंत हे संचालक कामकाज करू शकतात. मात्र   दुसरीकडे पणन मंत्र्यांकडून   बाजार समितीवर   प्रशासक नियुक्तीच्या हालचाल सुरु झाली आहे अशी माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळालेली आहे.ज्यामुळे   पणन मंत्रायच्या अशे   "चोरी चोरी चुपके चुपके" या निर्णयामुळे बाजार घटकांमध्ये संभ्रम निर्माण झाला   आहे  
मुख्यमंत्री साहेब, आम्हाला   आता तारीख नको निर्णय   द्या, अशी चर्चा आता बाजार आवरत संचालक मंडळ करत आहे ,१० महिन्यापासून न्यायालयात व शासन दरवारी   जाउन जाऊन आम्ही थकलो आहोत, त्यामुळे लवकरात लवकर निर्णय   द्या, ज्यामुळे बाजार समितीच्या कारभार सुरळीत होऊ शकतो,काही संचालकांनी व्यापारी   सोबत बोलत होते, १० महिन्यापासून जे लुपाछुपी खेळ सुरु आहेत यामध्ये राज्याचे   शेतकरी,वयापारी ,कामगार त्रस्त झाले आहे ,पणन मंत्री तुमचे सोबत जे चर्चा झाली आमही सगळे मान्य करतो ,सर्व संचालक मंडळ तुमचे मार्गदर्शनाखाली काम करणार असे ठरले मात्र, आता चूक कुठे झालं कि सुनावणी झाल्यावर परत तारीख   पे तारीख पडले आहेत , साहेब,आम्हाला   या तो कायमस्वरूपी करा नाहीतर   बरखास्त करा अशे मत   काही संचालकांनी वयापारी सोबत चर्चा करताना सांगत होते.  
मुंबई APMC मधील   ६ वर्ष प्रशासक राजवटी संपल्यावर मुंबई APMC मध्ये संचालक मंडळ अस्तित्वात आले, अडीच वर्ष सभापती अशोक डक आणि उप सभापती धनंजय वाडकर यांनी काम पहिले मात्र अडीच वर्ष या संचालक मंडळांनी शेतकरी ,वयापारी व कामगाराच्या हितासाठी एकही विकासकामे केली   नाही,विकास झाली तर या संचालकांचे ,अडीच वर्षाचा   कालावधी संपल्यानंतर सभापती अशोक डाक आणि धनंजय वाडकर यांनी राजीनामे देउन बोलले   महाविकास आघाडीला अडीच वर्ष संपले आहेत त्यामुळे आम्ही राजीनामा देतो मात्र प्रत्यक्ष या लोकांनी मार्केटच्या एकही विकास कामे न केल्याने राजीनामे दिले आहेत . त्यामुळे हे संचालक मंडळ लवकरात लवकर बरखास्त करून एक चांगले प्रशासक नियुक्ती करा ज्यामुळे बाजार समितीच्या कारभार सुरळीत चालू शकतो बाजार घटकांची मागणी आहे . न्यायालयाच्या दिलासा मिळाल्यावर संचालक मंडळ काही दिवसात धावपळ करून वैठक घेणार आणि पुढचे निर्णय ठरवणार, मार्केटच्या विकास कामेसाठी   पैसे कुठून आणणार, सध्या बाजार समितीच्या तिजोरीत ३० ते ३५ कोटी रुपये शिल्लक आहे यामध्ये पाचही मार्केटच्या विकास कशे होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलेली आहेत .
-मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी   ४ संचालकांच्या अपात्र निर्णय स्थगिती दिली असून ८ आठवडे म्हणजेच दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.   त्यामुळे संचालक मंडळाचे कोरम पूर्ण होत असल्याने पुढील कामकाज बैठका लवकरच सुरळीत   होतील. प्रकाश अष्टेकर, उपसचिव, मुंबई APMC