मुंबई APMC सभापती अशोक डक यांची पक्ष प्रवेशाची तयारी - प्रवेशद्वारावर बॅनरबाजी
नवी मुंबई :मुंबई Apmc च्या प्रवेशद्वारावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचे   दोन मोठे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत हे शुभेच्छांचे बॅनर   सभापती अशोक डक यांच्या वाढदिवसाचे आहेत. अनेकदा वाढदिवसाच्या बॅनर वरील नेत्यांचे फोटो तेच असतात पण आता कार्यवाहू सभापती अशोक डक यांनी त्यांच्या यंदाच्या वाढदिवसाच्या बॅनर वर थोडा बदल केलाय. राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक असलेल्या अशोक डक यांनी या आधी राष्ट्रवादीचे अधक्ष्य शरद पवार ,सुप्रिया सुळे , अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश असायचा पण यंदा वाढदिवसाच्या बॅनर मधे पहिल्यांदाच राष्ट्रवादी सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांच्या आदर्श व्यक्तींमध्ये त्यांचा सहभाग दाखवला आहे या मागचं नक्की कारण काय आहे ? राष्ट्रवादी , शिंदेंची शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्ष्यांसाठी अशोक डक यांचा पाठिंबा असल्याचं दिसून येतंय पण महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला का वगळण्यात आलं हा प्रश्न उपस्थित राहिलाय. या बॅनर च्या निम्मिताने शिंदे फडणवीस सरकारला   सभापती अशोक डक हात जोडून विनवणी करून सांगत आहेत कि साहेब आम्हाला वाचवा. 
नुकत्याच बाजार समितीच्या निवडणूक मधे जिंकून आलेले काही संचालक सोबत अशोक डक यांनी मुख्यलात भेट दिली आणि त्यावेळी काही   अधिकारी   आणि कर्मचाऱ्याने निवडून आलेले संचालकांचा सत्कार केला होता , करोडो   रुपये खर्च करून जिंकून आलेल्या या संचालकांना   आता पैसे कुठून येणार याबाबतीत चिंतेचं वातावरण निर्माण झाली आणि दुसरीकडे पणन मंत्र्याकडून कुठल्याही प्रकारची   मुदत मिळाली नाही 
मागील ६ महिन्यापासून सभापती आणि ऊप सभापती नसल्याने एकही मीटिंग   झाली नाही आणि सध्या बाजार समितीच्या निवडणुकीत अपात्र संचालक पेक्ष्या ९ संचालक निवडून आले तरी सुद्धा मुख्यमंत्री व पणन मंत्री एकनाथ शिंदे बाजार समितीवर येणाऱ्या संचालकांसोबत अद्याप बैठकलावण्यात आल्या नाहीत   आणि त्यामुळे कार्यवाहू सभापती यांनी आपल्या वाढदिवसाच्या बॅनर मार्फत साहेब तुमचं आमच्यावर लक्ष राहूद्या अशी विनंती केली आहे.