मुंबई APMC सभापती अशोक डक यांचा मार्केट पाहणी दौरा कि उप सचिवांच्या कॅबिनचा दौरा

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कार्यवाहू सभापती म्हणून काम पाहत आहेत. कार्यवाहू असताना त्यांना मार्केट बाबत कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. आपल्या पदावरून राजीनामा देऊन ६ महिने उलटले त्या सहा महिने कार्यवाहू काळात एकदाही मार्केटचा कारभार कश्या पद्धतीने चालतो याची विचारपूस देखील केली नाही. आता बाजार समितीचा सेस वाढल्याने पुन्हा एकदा सभापती होण्यासाठी कामांचा आढावा अशोक डक घेत आहेत.
अशोक डक यांनी २० जून रोजी कांदा - बटाटा मार्केट मध्ये जाऊन पाहणी दौरा केला यात व्यापाऱ्यांसोबत विविध समस्सेबाबत चर्चा करण्यात आली यात सगळ्यात मोठा प्रश्न हा ड्रेनेज लाईन चा आहे गेली अनेक वर्ष त्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.त्यानंतर सभापतींचा रथ धान्यमार्केट कडे वळाला तिथे गेल्यावर उप सचिवांच्या केबिन मध्ये मार्केट संचालक आणि ठराविक व्यापाऱ्यांना बोलवून बंद कॅबिन मध्येच धान्य मार्केटचा पाहणी दौरा झाला.
आज २१ जून रोजी भाजी पाला मार्केट पाहणी दौऱ्याची आखणी केली होती. भाजीपाला मार्केट रात्री दोन वाजता सुरु होतो सकाळी ९ पर्यंत मार्केट मधील घाऊक व्यापार संपतो मात्र कार्यवाहू सभापती ११. ३० वाजता मार्केट मध्ये दाखल झाले.
बाजार समिती मधे गाळे धारकांनी केलेली अनधिकृत बांधकामे ,पॅसेज आणि धक्यावर अनधिकृत शेतमाल आणि खाद्यपदार्थांची विक्री ,मार्केट मध्ये वाहतूक कोंडी या महत्वाच्या विषयावर चर्चा नाहीच ,पाहणी दौरा करणार असं सांगत भाजीपाला मार्केट मध्ये अशोक डक साहेब आले पण बाजार आवारात न फिरकता मार्केटच्या कॅबिन कडे वळाले. मार्केट बाबतची चर्चा , मार्केटचा पाहणी दौरा देखील केबिन मध्ये निवांत बसून केला त्यानंतर साहेब मार्केट मधून परतले.
सभापती अशोक डक यांच्या बंद कॅबिनच्या पाहणी दौऱ्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत .
सभापती अशोक डक यांची सकाळ उशिरा झाल्याने ते मार्केट मध्ये उशिरा पोहचले यावरून खरच अशोक डक यांना मार्केटचा पाहणी दौरा करायचा होता का ?? व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अशोक डक सक्षम आहेत का ??
सभापती वेळेवर आले असते तर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या गैर कारभाराची पोलखोल झाली असती पण अशोक डक यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या वेळेत मार्केट मध्ये एंट्री केली कार्यवाहू सभापती कॅबिन मध्ये असतानाही एकीकडे हा गैर कारभार चालूच होता. यावरून तात्पर्य एवढच निघतय कि कार्यवाहू सभापती अशोक डक हे सुरक्षा अधिकाऱयांच्या आदेशच पालन करतात का ?? अश्या प्रकारे धान्य मार्केट आणि भाजीपाला मार्केटमधील बंद कॅबिन दौरे पार पडले. मार्केट मध्ये चालेल्या गैर कारभाराला कार्यवाहू सभापती अशोक डक यांचा पाठींबा आहे का ? अश्या चर्चा बाजार आवरात सुरु आहे.