-मुंबई APMC सभापती ऍक्शन मोडवर; नव्या दक्षता पथकाची स्थापना ,10 दिवसात 11 लाखाची दंड वसुली

-दक्षता पथकाकडून जवळपास 6 कोटी रुपयांच्या शेतमालावर कारवाई व्यापाऱ्यांकडून 11 लाख दंड वसूल
-मुंबई एपीएमसीकडून बिना लाइसेंस शेतमालाची आयात ,निर्यात व अनधिकृत व्यापार करणारे 7 वाहनेवर कारवाई
-10 दिवसात त्यांच्याकडून जवळपास 11 लाख दंड वसुल
नवी मुंबई :मुंबई APMC वर सभापती म्हणून प्रभू पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून उत्पन्न वाढीसाठी त्यांनी आपल्या पद्धतीने धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. सभापतीनी सर्वात पहिल्यांदा दक्षता पथका मधे फेर बदल करून एक नवीन दक्षता पथक तयार केले आहे ,या दक्षता पथकाने मागील १० दिवसात बाजार समितीचा सेस न भरता मोठ्या प्रमाणात शेतमालाचा अनधिकृतपणे आयात करणाऱ्या आयातदारांवर कारवाई केली आहे. हे आयातदार बाजार समितीच्या विना अनुज्ञप्ती शिवाय व्यवसाय करत होते . या आयातदारांच्या , आणि व्यापाऱ्यांच्या ,बाजार समितीचा सेस बुडवणाऱ्या गाड्या या पथकाकडून पकडण्यात सुरुवात केली आहे . आत्ता पर्यंत अश्या सात गाड्या पकडण्यात आल्या आहेत . या गड्यांमध्ये मोठ्या कंटेनर चा समावेश आहे. या मालाची किंमत जवळपास ६ कोटींच्या घरात आहे. पथकाने पकडकेल्या वाहनामध्ये वेलची ,लवंग ,बासमती तांदूळ ,चवळी ,सूर्यफूल ,नाचणी आणि राजमाचा समावेश आहे, याच्या कडून जळपास ११ लाखाची दंड वसुली आत्ता पर्यंत करण्यात आली आहे. ही संख्या आणखीन वाढन्यायची शक्यता आहे . ,यामुळे बाजार समितीच्या विना परवानगीने ,मालाची आयात निर्यात ,आणि किरकोळ व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये या दक्षता पथकाची दहशत निर्माण झाली आहे. दक्षता पथकाची कारवाई आपल्यावर ही कधी होवू शकते अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे, आणि त्यामुळे त्यांचे द्याबे दणाणले आहेत . या पथकामध्ये मुंबई बाजार समितीचे सचिव पी एल खंडागले यांच्या मार्गदर्शनाखाली उप सचिव महेश साळुंके पाटील ,अनंत पारदुले , संजय खांडेकर , अजित नारंगकर, विनीत उबाळे यांचा समावेश आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अश्या प्रकारे अनधिकृत पणे व्यापार आयात निर्यात करण्यापेक्षा बाजार समितीची अनुज्ञप्ती घेवून व्यापार करावा असे आवाहन सभापती प्रभू पाटील यांनी केले आहे.