मुंबई APMC संचालकांकडे टॅब असूनही पेपरवर्क सुरूच ; टॅब परत करण्याची मागणी
 
-संचालक मंडळाकडे टॅब असूनही पेपरवर्क सुरु होते.
-टॅब वर ८ लाख खर्च करूनही पेपरवर्क च्या स्टेशनरी साठी लाखोंचा खर्च
-APMC   प्रशासनाकडून १० संचालकांना ipad तर ६ सदस्यांना सॅमसंगचे टॅब वाटप
-बाजार घटकांकडून   संचालकांना टॅब परत करण्याची मागणी
 
नवी मुंबई : मुंबई APMC सभापती अशोक डक यांनी बाजार समितीमध्ये संचालक मंडळाचा कामकाज पपेपरलेस करून कामकाजाला गती देण्यात यावी यासाठी   टॅब   उपयुक्त ठरणार असा प्रस्ताव मांडून बाजार समिती प्रशासनाकडून मंजूर करून घेतले   होते पण संचालकांचा एक पाऊल पुढे जाण्याचा निर्णय अजूनही ठप्प. संचालकांनी पेपरलेस काम करून आपले कामकाज लवकर व सुरळीत व्हावे या साठी एक पाऊल पुढे जाऊन टॅब घेण्याचा विचार केला पण संचालक मंडळात अजूनही फक्त पेपर वर्क च चालू होते   एकदाही टॅब चा वापर करण्यात आला नाही. संचालक मंडळात एकूण १८ सदस्य आहेत त्या पैकी १६ सदस्यांनी टॅब घेतले   होते यामध्ये   १० संचालकांनि   iPad घेतले तर अन्य ६ संचालकांनी सॅमसंग चे टॅब घेतले. ipad ची प्रत्येकी किंमत ८० हजार   तर सॅमसंग ची प्रत्येकी किंमत ६० हजार बाजार समिती प्रशासन कडून देण्यात आले होते. महागातले टॅब घेऊन सुद्धा टॅब चा वापर शून्य पण पेपरवर्क करण्यासाठी लागणाऱ्या स्टेशनरी चा लाखो रुपये   खर्च देखील बाजार समिती कडून   घेतला जात होता. टॅब घेऊन सुद्धा पेपरवर्क सुरु होते   मग टॅब खरेदी करून संचालक मंडळाने काय काम केलं ?? असा प्रश्न बाजार घटक उपस्थित   करत आहेत. जवळपास ८ लाख रुपये खर्च करून संचालक मंडळाला टॅब देण्यात आले होते पण त्या टॅब वर ८ टक्के   देखील काम झाले नाही त्यामुळे घेतलेले टॅब परत करा अशी मागणी बाजार   घटक करत आहेत . सध्या कोरम नसल्याने मुंबई APMC संचालक मंडळ एक वर्षांपासून अस्तित्वात नाही , संचालक मंडळाची न्यायालय व शासन दरबारी   सुनावणी सुरु आहे. यावर मुंबई apmc चे सचिव राजेश भुसारी यांनी सांगितले कि , पेपरलेस काम करण्यासाठी संचालकांना टॅब देण्यात आली होती आता त्यांचा कार्यकाळ संपल्यावर टॅब जमा करण्यासाठी आदेश काढणार आहे.