Mumbai APMC Director VS Rajendra Patil | मुंबई APMC संचालक मंडळ आणि राजेंद्र पाटील यांच्या अस्तित्वाचा फैसला लांबणीवर? मुंबई हायकोर्टातील सुनावणी पुढे जाणार-सूत्र
APMC Director   VS Rajendra Patil : आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सत्तासंघर्षाची मुंबई हायकोर्टात आज होणारी सुनावणी पुढे   जाण्याची शक्यता आहे. आज म्हणजेच ३१ जुलाई रोजी मुंबई हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीची शक्यता कमी आहे. सुनावणी होणाऱ्या यादीत संचालक मंडळाच्या सुनावणीचा ७९ वा क्रमांक   आहे , त्यामुळे आज होणारी सुनावणी पुढे जाण्याची शक्यता आहे.   ३ आगस्ट रोजी होणाऱ्या मुंबई APMC संचालक मंडळाचा सभेचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे . मुंबई APMC संचालक मंडळावर एक वर्षापासून अपात्रतेची टांगती तलवार , कोरम पूर्ण न झाल्याने बाजार समितीमध्ये सभा नसल्याने संचालक मंडळ अस्थिर आहे ,त्यामुळे संचालक मंडळाने नागपूर पासून मुंबई पर्यंत शासनाचा विरोधात न्यायालयाची लढाई सुरु केली आहे ,   संचालक मंडळामध्ये पडलेल्या फुटीमुळे संचालक विरोधात संचालकची लढाई सुरु झाली आहे ,मुंबई APMC संचालक मंडळाचा   सत्ता संघर्ष आता मुंबई उच्च   न्यायालयात   पोहोचलाय. मुंबई APMC सचिव राजेश भुसारी यांनी संचालक मंडळाच्या सभेचे परिपत्रक काढले आहे. सदर सभा सभापती अशोक डक यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे , कार्यवाहु सभापती अशोक डक गटाला   कमकुवत करण्यासाठी आणि ३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेच्या विरोधात संचालक राजेंद्र पाटील यांनी सभा रद्द करावे आणि ११ संचालकांचे   सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली आहे. त्याबाबत पिटिशनही दाखल करण्यात आले आहे. मात्र आज होणाऱ्या सुनावणीत ७९ वा क्रमांक मिळाल्याने सदर   सुनावणी पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे संचालक मंडळामध्ये " कहीं खुशी कहीं गम " अशी परिस्थिती पाह्यला मिळणार आहे.