मुंबई APMC धान्य व मसाला मार्केट पाण्यात - सभापती,संचालक मंडळ मिटिंग लावण्यात व्यस्त
Mumbai Apmc: मुंबई APMC धान्य आणि मसाला मार्केट बाजार समिती सर्वात जास्त सेस देणारे मार्केट आहेत.   हे दोन्ही मार्केट सध्या पाण्यात गेले आहेत. यामुळे पावसापूर्वी कामाची पोलखोल झाली आहे. पावसाला सुरुवात होताच रस्त्यांवर खड्डे आणि ड्रेनेजलाईनवर पाणी साचण्यात येत   आहे . त्यामुळे व्यापारी, माथाडी कामगार, ग्राहक, वाहतूकदाराना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. थोडा पाऊस पडताच, पाण्याचा निचरा होत नसल्याने दरवर्षीच हि परीस्थिति पाहायला मिळत असते. यावरून प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या   निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल होताना दिसत असते.गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांची आणि ड्रेनेज लाईनची अवस्था बिकट झाली असून, जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनचालकांची तारांबळ उडत असून, परिणामी रस्त्यांवर वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. पावसामुळे बाजार घटक त्रस्त असताना सभापती ,संचालक मंडळ   मात्र मिटिंग लावण्यात   व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. 
मार्केट संचालक यांच्या मर्जीतील कंत्राटदाराला कामे देण्यासाठी बाजार समिती कडून काढण्यात आलेल्या रस्ते ,गटार कामाच्या निविदावर संचालक यांनी सभेमध्ये आक्षेप घेतले होते यावर बाजार घटकांनी तीव्र विरोध केला होता. मात्र आता सांगण्यात येत आहे की संचालक मंडळाच्या मीटिंग नसल्याने मार्केटची विकास कामे रखडली आहेत.
आपल्या कंत्राटदाराला कामे देऊन   यामध्ये काही संचालक या कामातून टक्केवारी मिळवत असतात त्यामुळे मार्केटमध्ये जी कामे होतात त्याचा कंत्राटदारांना फायदा होत नसल्याने थुकपट्टी काम करत असल्याचे एका कंत्राटदारांनी सांगितले आहे.  
सभापती अशोक डक,संचालक आणि   प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत सर्वेक्षण केल्याचा दावा फोल ठरला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर आणि धक्क्यावर फारसे पाणी   साचणार नाही आणि   खड्डे पडणार नाहीत, असा दावा APMC प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र, पावसाला सुरुवात होताच रस्त्यांवर खड्डे आणि ड्रेनेजलाईनवर पाणी साचल्याने APMC चा हा खर्च 'खड्ड्यात' गेल्याची टीका बाजार घटकांकडून केली जात आहे. . सचिव राजेश भुसारी यांनी पावसापूर्वी कामाच्या पहाणी दौऱ्यात सांगितल होते की मार्केटमध्ये पाणी साचल्यास पंपाद्वारे काढ्यात येईल मात्र मुंबई APMC मार्केटमध्ये आपतीव्यवस्थापन पाण्यत गेल्याचे दिसून येत आहे.