Apmc Tender: लाडक्या कंत्राटदारांसाठी मुंबई APMC धान्य मार्केट अभियंत्याची नवी योजना सभापती ,संचालक, ठेकेदार लाभार्थी?
धान्य मार्केटच्या लाडक्या अभियंत्यामुळे बाजार समितीची तिजोरी होणार रिकामी?
धान्य मार्केटच्या विकासकामांसाठी वर्ष 2024/25 अर्थसंकल्पात जवळपास १०९ ते १२० कोटी रुपयांची तरतूद
संचालक मंडळाचा कालावधी थोडेच दिवस राहिला असून बाजार समितीच्या तिजोरीवर डल्ला मारण्याची तयारी सुरू झाली आहे व यामधे लाडक्या अभियंत्याचे मोठा योगदान
Mumbai Apmc Update : मुंबई APMC धान्य मार्केट संचालक व बाजार समितीचे काळजीवाहू सभापती यांच्या लाडक्या अभियंत्याचे कारनामे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या अभियंत्याने काळजीवाहू सभापती, मार्केट संचालक व ठेकेदाराला खुश करण्यासाठी जवळपास ११० कोटींच्या कामाची अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्याची माहिती समोर आली आहे .
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वर्ष २०२४/२५ अर्थसकल्पात मार्केटमध्ये जवळपास ११० ते १२० कोटींच्या कामाची तरतूद   करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या धान्य मार्केटमध्ये   जवळपास ३५ कोटींची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे जिथे गरज नाही तिथे सुरू आहेत. यावर वेळोवेळी अधिकारी कर्मचारी संगठनातर्फे आवाज उठवला   जात आहे . मात्र या अभियंताला काहीही पडलेले नाही . बाजार समितीच्या तिजोरीमध्ये केवळ ६० कोटी शिल्लक आहेत, मात्र त्याच्या दुप्पट खर्च करण्याची योजना या अभियंत्याने आखली आहे. त्यामुळे हा अभियंता ठेकेदाराला फायदा पोहोचवण्यासाठी सदर कामांसाठी धावपळ करत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे .