मुंबई APMC धान्य मार्केट अभियंताच्या नियोजन शून्य कारभारामुळे बाजार घटकांचे जीव धोक्यात
नवी मुंबई : मुंबई Apmc धान्य मार्केट मधील व्यापार भवनच्या आरक्षीत उद्यानाचे जागेवर ६ महिन्यांपूर्वी झाडे कापून अनधिकृतपणे पत्राचे शेड टाकण्यात आले होते या शेडवर महापालिका तर्फे कारवाई देखील केली होती सदरच्या जागेवर ६ महिन्यापासून तोडण्यात आलेल्या पत्रांचे   शेड त्याच ठिकाणी पडले आहेत.
या जागेवर पडलेलय   पत्रामुळे आताच्या परिस्थितीत वादळवाऱ्याने मोठी   दुर्घटना होऊ शकते त्या जागेवर माथाडी कामगार मधल्या वेळात निवांत बसतात काही वेळासाठी विश्रांती देखील करतात अश्यावेळी कोणती जीवित हानी घडली तर याला जबाबदार कोण ? 
मार्केट अभियंताच्या नियोजन शून्य कारभारामुळे व्यापारी , वाहतूकदार , माथाडी कामगारांचा जीव देखील जाऊ शकतो.  
यावर माथाडी कामगार आणि वाहतूकदारने तीव्र नाराजगी व्यक्त केली असून सदर पत्रे रिकामे करा अशी मागणी Apmc प्रशासनकडे केली आहे मात्र मार्केट अभियंता कामगारांचा जीव जाण्याची वाट बघत आहेत हा ? असा प्रश्न उपस्थित राहिलाय