मुंबई APMC प्रकरणी कोर्टाचा निकाल;महाविकास आघाडीचा APMC मधील डाव यशस्वी – फडणवीस सरकारची नाचकी!

मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) संचालक मंडळाने फडणवीस सरकारला मोठा झटका दिला आहे. मुंबई Apmc उपसभापती हुकूमचंद आमधारे, धनंजय वाडकर,(काँग्रेस )तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे संचालक अशोक वाळुंज यांनी निवडणूक न लावल्याने बाजार समितीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केले होते.याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने बाजार समिती व सरकारविरोधात निकाल दिला आहे.
कोर्टात सरकारची बाजू मांडण्यासाठी कोणी अधिकारीच हजर राहिला नाही. त्यामुळे हा निकाल फडणवीस सरकारविरोधात गेला, अशी चर्चा रंगली आहे.हा निकाल संचालक मंडळाच्या बाजूने लागला. कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, लवकरात लवकर निवडणुका घ्या आणि निवडणुका होईपर्यंत मंडळ कुठलाही धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार नाही असे समजते .
३१ ऑगस्ट रोजी मुंबई Apmc संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर तात्पुरता प्रशासक म्हणून पणन संचालक विकास रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र,महाविकास आघाडीतील उप सभापती व संचालक कोर्टात याचिका दाखल केला होता.
बाजार आवारात अशीही कुजबुज सुरू आहे की सचिवांनी विरोधकांसोबत हातमिळवणी करून प्रशासक रसाळ यांच्या ‘करेक्ट गेम’ रचला. राष्ट्रीय बाजार आदेश   हालचालींना वेग आला असताना, कोर्टाच्या या आदेशामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.