मुंबई Apmc कनिष्ठ अभियंता पिंगळे याना प्रभारी उप अभियंता म्हणून गेले ८ वर्षापासून अनधिकृत रित्या नियुक्ती!
Mumbai Apmc :कुठल्याही सरकारी आणि निमसरकारी संस्थांमध्ये   प्रभारी नियुक्तीचा   कालावधी ६ महिने ते १ वर्षा पर्यंत असतो मात्र मुंबई Apmc मार्केटच्या अभियांत्रिक विभागने प्रभारी पद   जवळपास ८ वर्षापासून दिल्याची   माहिती समोर आले आहे .यामध्ये आर्थिक कारण समजले जात आहे . 
धान्य मार्केट मधील प्रभारी उप अभियंता   पांडुरंग पिंगळे यांच्या ७ ते ८ वर्षापासून प्रभारी उप अभियंता पदावर नियुक्ती   केलेली आहे त्यामुळे शासनाने काढलेले परिपत्रकला अभियात्रिक विभागाने केराची टोपली दाखवली आहे .कार्यक्ष्रम नसलेल्या या अभियंतना इत्येक वर्ष देण्याचे उदेश्या काय अशी अभियंतावर कारवाई करण्याऐवजी त्याना मोठे मोठे प्रकल्प देण्यात येत आहे
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रभारी पदावर 6 महिने व एक वर्षांपेक्षा जास्त काळ दिला जात असल्याचे माहिती समोर आले आहे त्यामुळे राज्य सरकारच्या   1985 व 1990 च्या शासन निर्णयाला बाजार समितीने केराची टोपली दाखविली आहे .
एक वर्षानंतरही बाजार समितीचे कनिष्ठ अभियंता पांडुरंग पिंगळे यांच्याकडे मागील आठ वर्षांपासून उपअभियंता या पदाचा प्रभारी (अतिरिक्त कार्यभार) देण्यात आलेली   आहे. एका कनिष्ठ अभियंताला प्रभारी उप अभियंता पदावर कित्येक वर्षापासून नियुक्ती करण्याची   कारण काय आहेत आम्ही तुम्हाला दाखवणार या प्रभारी उप अभियंताच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा लेखा जोखा
नाव   -पांडुरंग पिंगळे
-मुंबई Apmc मधे वर्ष १९९८ मधे झाली नियुक्ती
-२००९ ते २०१२ धान्य मार्केटचे   कनिष्ठ अभियंता
-२०१२ ते २०१५ फळ मार्केटचे कनिष्ठ अभियंता
-२०१५ ते १६ -कांदा बटाटा मार्केट मधून   प्रभारी उप अभियंता पद प्रशासकीय कालावधीत
-२०१६-१८- भाजीपाला मार्केट उप   अभियंता
-२०१८-२१- मसाला मार्केट उप अभियंता ७ कोटींचं   काम
-२०२१-२३   सध्याची कामाचा ठिकाण धान्य मार्केट प्रभारी उप अभियंता
-फळ मार्केट मधे वर्ष २०१२ ते २०१६   दरम्यान   कनिष्ठ अभियंता   म्हणून होते त्याच्या कालावधीत   फळ मार्केटच्या बहुद्देशीय इमारत   बांधकामात गैव्यवहार   झाल्याने १० वर्ष होऊन सुद्धा बहुउदेशीय इमारत पडून आहे
-२०१६ ते २०१८ प्रभारी उप अभियंता   असताना कांदा बटाटा मार्केटच्या   धोकादायक गाळे सोडून   रस्ते ,गटार आणि पिण्याचे पाण्याचा   प्रश्न ऐरणीवर
-२०१८ ते २०२१ प्रभारी उप अभियंता ,मसाला मार्केट येथील ७ कोटीचा रस्ते कामात मोठा प्रमाणात अनियमित ,काँक्रीट रस्ते कागदावरच
-२०२१ ते २०२३ प्रभारी उप अभियंता धान्य मार्केट मध्ये ही ६ कोटीचा अनाठाई कामे   व फूटपाथ वर अनाधिकृत बांधकामे
-व्यापारी भवन चे गार्डनच्या जागेवर झाडे तोडून अनधिकृत शेड बांधकाम   त्या जागेवर नवी मुंबई महानगर पालिकेची तोडक कारवाई करण्यात आली मात्र   संबधित मार्केट अभियंता वर कुठल्याही कारवाई झाली नाही त्यामुळे अशे अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी बाजार घटक करीत आहे .