मुंबई APMCतील मालमत्ता विक्री प्रकरण ; संचालक मंडळाकडून कोट्यवधींच्या गाळ्यांची निविदा, एका गाळ्यामागे 20 ते 25 लाखांच्या डील?
.jpg)
मुंबई APMCतील मालमत्ता विक्री प्रकरण संचालक मंडळाकडून कोट्यवधींच्या गाळ्यांची निविदा, एका गाळ्यामागे 20 ते 25 लाखांच्या डील?
-“शेतकऱ्यांची मालमत्ता लाटण्याचा कट? APMC संचालक मंडळाचा मालमत्ता विक्रीचा डाव उघड!”
-नागपूर APMCला SIT, मग मुंबईला का नाही? — संचालक मंडळाच्या मालमत्ता विक्रीवर संशय”
-FSI घोटाळ्यानंतर आता मालमत्ता विक्री घोटाळा’? ‘खाली टेबल’ सौदेबाजी!
मुंबई एपीएमसी मसाला मार्केट मधील 65 कोटी रुपयांची FSI घोटाळ्याची पुनरावृत्ती?
-CM ,पणन मंत्री,पणन सचिव गप्प, APMC संचालक मंडळ मात्र गाळे विक्रीत गुंतले!”
-शेतमालाच्या साठवणुकीसाठी उभारलेली मालमत्ता खाजगी गटांना विकण्याचा डाव संचालक मंडळ जाता जाता मोठा प्रमाणात आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता.
नवी मुंबई | एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : नवी मुंबईच्या वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) मोक्याच्या जागेवरील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता शेतकऱ्यांऐवजी दलालांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण विक्री प्रक्रियेवर राज्याचे मुख्यमंत्री ,पणन मंत्री व पणन सचिव   गप्प असून, संचालक मंडळ मात्र गाळ्यांच्या वाटप व विक्रीत गढलेले दिसत आहेत. वायरहाऊसिंग व निर्यात भवनातील एकूण २३० पेक्षा अधिक गाळे बाजारभावाच्या तुलनेत कमी दराने विक्रीसाठी निविदा काढण्यात आल्या असून, यामागे मोठ्या आर्थिक व्यवहारांचे गोपनीय जाळे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुंबई APMC मधील विविध प्रकल्पातील मोक्याच्या जागा कोट्यवधी रुपये खर्चून उभ्या करण्यात आल्या होत्या, मात्र आता त्या कमी दरात विक्रीसाठी काढण्याचे संचालकांचे डावपेच सुरू आहेत. यावरून शेतकरी प्रतिनिधी व मार्केट संचालकांमध्ये मोक्याचे जागेवर संघर्ष उफाळून आला असून, शासनाचे निष्क्रिय व शांत भूमिका संशयास्पद ठरत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एपीएमसीच्या धान्य मार्केट समोरील भूखंड क्र. 2 मधे 23 व माथाडी भवनसमोरील भूखंड क्र. 15 येथील 52 गाळे तसेच फळ मार्केट मधील बहुउदेशीय इमारतीत 128 गाळे आणि कार्यालय सध्या बिक्री साठी काढण्यात येत आहे ….बिशेष म्हणजे सर्व मालमत्ता बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत अल्पदराने विक्रीसाठी काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहेत. त्यातील धान्य मार्केट समोर मोक्याची ठिकाणी असलेल्या वायरहाऊसिंगमधील 23 स्टोरेज गाळ्यांसाठी निविदा प्रक्रिया आधीच काढण्यात आली आहे .
‘मलाई’ साठी संचालक मंडळाकडून धावपळ सुरू : एका गाळ्यामागे २०–२५ लाखांच्या डीलची चर्चा?
या गाळ्यांमागे मोठे अर्थकारण दडल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकी गाळ्यासाठी २० ते २५ लाख रुपये ‘खाली टेबल’ व्यवहारात घेतले जाणार असून, ज्यांनी हे पैसे दिले आहेत त्यांनाच ही मोक्याची जागा मिळणार, अशी चर्चा बाजार आवारत सुरू झाली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेतकरी प्रतिनिधी आणि मार्केट संचालक मधे काही दिवसापासून संघर्ष सुरू आहे.आता या व्यवहार साठी फळ व भाजीपला मार्केट संचालक यांच्या नाव आघाडीवर असल्याचे समजते.
“ही मालमत्ता सर्वांची – केवळ संचालक मंडळाची नाही” – शेतकरी प्रतिनिधींचा आक्षेप
शेतकरी प्रतिनिधींचा स्पष्ट आरोप आहे की, “ही मालमत्ता बाजार समितीची असून, त्यावर सर्व शेतकऱ्यांचा आणि आयात आणि निर्यातदाराचा हक्क आहे. मात्र संचालक मंडळ ती केवळ स्वतःच्या फायद्यासाठी विक्रीस काढत आहे.” दुसरीकडे मार्केट संचालक गाळे पूर्णपणे आम्हाला द्यावेत, असा आग्रह धरत आहेत, आणि या मागणीसाठी सतत बैठकांचे सत्र सुरू आहे.
धुळखत पडलेल्या प्रकल्पावर आता ‘नजर’ कोट्यवधींचे कर भरल्यानंतर विक्रीचा डाव?
गेल्या ५ वर्षांपासून ही मालमत्ता वापरात नव्हती. त्यामध्ये सिडकोची लीज प्रीमियम, नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर, विविध कर यासाठी बाजार समितीच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. आता संचालक मंडळ ‘जाता जाता’ हे गाळे विक्री करून नफा कमवण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
राज्याचे मुख्यमंत्री ,पणन मंत्री आणि पणन सचिव यावर गप्प का? चौकशीची मागणी
मुख्यमंत्री व पणन मंत्री वारंवार सांगतात की “शेतमालाला हमीभाव, साठवणूकसाठी व कोल्ड स्टोरेजसाठी उत्तम सुविधा देऊ”, पण आता हीच मालमत्ता विक्री करून कोणाच्या फायदा करणार ? संचालक मंडळाच्या निर्णयावर पणन मंत्री   गप्प का आहे? यावर संशय व्यक्त केला जातो.
FSI घोटाळ्याची पुनरावृत्ती?
या प्रकरणातही मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमधील 62 कोटी एफएसआय घोटाळ्याच्या धर्तीवर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राज्य सरकारच्या पणन विभागाने तातडीने चौकशी सुरू करून संपूर्ण व्यवहार थांबवण्याची मागणी बाजरघटकांकडून होऊ लागली आहे.
-मुंबई APMC मालमत्ता विक्री की आर्थिक लूट?
-230+ गाळे बाजारभावाच्या तुलनेत स्वस्तातकोट्यवधींचा व्यवहार खाली टेबलवर?
-मुंबई APMC मसाला मार्केट FSI घोटाळा: 65 कोटींची पुनरावृत्ती?
-APMC संचालक मंडळाकडून शेवटच्या टप्प्यात विक्रीची घाई!