BIG BREAKING : मुंबई APMC संचालक मंडळ बरखास्त; विकास रसाळ प्रशासक म्हणून रुजू
.png)
नवी मुंबई: पाच वर्षांच्या कार्यकाळानंतरही मुदतवाढ मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) संचालक मंडळाला पणन मंत्री जयकुमार रावल यांनी थेट घरचा आहेर दिला आहे. संचालक मंडळाला बरखास्त करून, प्रशासक म्हणून पणन संचालक विकास रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर झालेल्या गैरव्यवहारांमुळे शेतकरी, प्रामाणिक व्यापारी आणि माथाडी कामगार बाजार समितीतून हद्दपार झाले. रस्त्यावर बसणारे विक्रेते, अनधिकृत स्टॉल, निकृष्ट दर्जाची कामे, पॅसेज-धक्क्यांची तोडफोड, ड्रेनेजमध्ये अडथळे यामुळे वाहतुकीचा गोंधळ आणि कोंडी सातत्याने होत होती. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह विविध संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे आणि पणन मंत्र्यांकडे तक्रार नोंदवली होती.
या गंभीर तक्रारींना प्रतिसाद देत रावल यांनी संचालक मंडळाला मुदतवाढ नाकारत बरखास्त केले. आता लवकरच राष्ट्रीय बाजार समितीची घोषणा होणार असून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह प्रमुख बाजार समित्या या राष्ट्रीय बाजार समितीचा भाग होणार आहेत. यामुळे शेतकरी, प्रामाणिक व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्या ‘अच्छे दिन’ येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.