पणन मंत्री बैठकीत मुंबई APMC सचिव गैरहजर; जयकुमार रावल संतापले!

मुंबई APMC मसाला मार्केट पुनर्विकास, राष्ट्रीय बाजार समिती आणि शेतकरी–व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा
मुंबई :पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार २३ सप्टेंबर रोजी मुंबई APMC संदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. दुपारी २ वाजता नियोजित या बैठकीसाठी अनेक महत्त्वाचे विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, बैठकीदरम्यान मुंबई APMC सचिव डॉ. पी.एल. खंडागले गैरहजर राहिल्याने मंत्री रावल संतापले. विशेष म्हणजे बैठक संपल्यानंतर सचिव आपल्या टीमसह पोहोचल्याचे समजते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजी वृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बैठकीत चर्चिले गेलेले महत्त्वाचे मुद्दे:
• मुंबई APMC मसाला मार्केट सेंट्रल फॅसिलिटी इमारतीचा पुनर्विकास
• राष्ट्रीय बाजार समितीसाठी नवीन कमिटीमध्ये व्यापारी प्रतिनिधींचा समावेश
• नियमनमुक्त फळ–भाजीपाला बाजार पुन्हा APMCमध्ये आणणे
• २० वर्षांपासून रखडलेला कांदा–बटाटा मार्केटचा पुनर्विकास
बैठकीला पणन मंत्री जयकुमार रावल, वनमंत्री गणेश नाईक, पणन सहसचिव, पणन संचालक तसेच फळ ,भाजीपला ,मसाला आणि दाना मार्केट संचालकसह मार्केटचे प्रमुख व्यापारी संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र कांदा–बटाटा मार्केटचे संचालक आणि काही प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळेही नाराजी व्यक्त करण्यात आली.
या बैठकीत मंत्री रावल यांनी सकारात्मक निर्णयाची भूमिका घेतली. मात्र, सचिव डॉ. खंडागले यांच्या उशिरा उपस्थितीमुळे बाजार समितीच्या विकासकामांवर सखोल चर्चा होऊ शकली नाही.
दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडत,
• मार्केटचा पुनर्विकास व्यापाऱ्यांच्या सल्ल्याने करावा
• राष्ट्रीय बाजारातील नव्या कमिटीमध्ये व्यापारी प्रतिनिधींना स्थान द्यावे अशी ठाम भूमिका मांडली.
या संचालक मंडळातून   जर राष्ट्रीय बाजार समितीवर घेण्याची तयारी पणन मंत्री इच्छुक आहेत तर या मंडळातील इच्छुक संचालक मागील १० वर्षापासून बाजार समितीत प्रतिनिधित्व करतात त्यामुळे या लोकांची रिपोर्ट कार्ड तपासणी करून निर्णय घ्यावी   अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे .
संचालक मंडळाने केलेले कामाची माहिती खालील प्रमाणे :
-बाजार आवारत शेतमालाला योग्य भाव न मिळणे
-शेतकऱ्यांसाठी असलेले लिलावगृहांवर बोगस अडत्यांचा कब्जा
-रस्ते व ड्रेनेज लाइनमध्ये निकृष्ट दर्जाची कामे करून बाजार घटकांना खड्यात आणि पाण्यात टाकणे
-मागील ५ वर्षांतील १५० कोटी रुपयांचे प्रकल्प धुळखात पडणे
-मसाला मार्केटच्या ६२ कोटी FSI घोटाळ्यात संचालक मंडळातील अनेकांची नावे असून सुद्धा कारवाई शून्य
या सर्व मुद्यांवर आजवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने व्यापाऱ्यांत तीव्र नाराजी आहे.त्यामुळे राष्ट्रीय बाजार मध्ये चांगल प्रशासक नियुक्ती करा जेणेकरून शेतकरी,व्यापारी ,आयातदार यांना दिलासा मिळेल.
राष्ट्रीय बाजार मध्ये येणाऱ्या कमिटीत चांगल प्रशासक घ्या शेतकरी ,व्यापारी आणि माथाडी कामगारांना खड्यात आणि पाण्यात टाकून हद्दपार करणारे या संचालकाना हद्दपार करा .व्यापाऱ्यांची मागणी