Mumbai Apmc Secretary: मुंबई APMC सचिवपदी डॉ. पी. एल.खंडागळे; 18 सप्टेंबरला पदभार स्वीकारणार
 
Mumbai Apmc Secretary: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेश भुसारी यांची उचल बांगडी करण्यात आले आहे .त्यांच्याकडून सचिव पदाचा कार्यभार काढून खालचा पद (अतिरिक्त सचिव) पदावर नेमणूक करण्यात आली आहे . राज्याचे   सहकार विभागाचे अपर निबंधक व   राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांच्याकडे आता मुंबई APMC सचिव पदाची जबाबदारी देण्यात आल्याची   आदेश सहकार विभागाचे सह सचिव सं. पु. खोरगडे यांनी 15 सप्टेंबर रोजी जारी केले आहेत. त्यामुळे उद्या 18 सप्टेंवर रोजी नवीन सचिव बाजार घटकांना मिळणार आहे .
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव पदासह डॉ. खंडागळे यांनी यापुर्वी सहकार आयुक्तालयातील अपर निबंधक ( पतसंस्था ), पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, आयुक्तालयात अपर निबंधक (गृहनिर्माण), अपर आयुक्त व विशेष निबंधक आणि अपर निबंधक (लेखापरिक्षण) या पदावरही काम केलेले आहे. 
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली   सुमारे 260 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक एकावेळी व यशस्वीपणे यावर्षी पार पडला होता . हा निवडणूक यशस्वी करण्यामागे खंडगळे यांचा मोठा वाटा होता . खंडगळे यांच्या जागे रिक्त झाल्याने निवडणूक प्राधिकरणच्या सचिव पदाचा अतिरिक्त पदभार सह सहकारी निवडणूक आयुक्त वसंत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.