मुंबई APMC सचिव येणार अडचणीत - सभेच्या विरोधात बाजार घटक मुंबई हायकोर्टात जाण्याची तयारीत!
Mumbai APMC Meeting: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला डावलून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेश भुसारी यांनी बाजार समितीची   उपसमिती सभा घेण्यासाठी   जोरदार तयारी सुरु केली आहे , सभापतींनी   राजीनामा दिल्यावर सर्व उपसमिती   आपोआप रद्द होतात.त्यामुळे येणाऱ्या काळात सचिव   अडचणीत येणाची शक्यता   आहे . भुसारी यांच्या विरोधात काही बाजार घटकांनी मुंबई हायकोर्टात जाण्याची तयारी सुरु केली आहे.   सचिव राजेश भुसारी यांनी ३ ऑगस्ट रोजी   Apmc प्रशासकीय इमारतीमध्ये संचालक मंडळाची सभा घेतली होती आता येणाऱ्या २१ ऑगस्ट रोजी उपसमितीची सभा घेण्यासाठी सचिवांनी   तयारी सुरु केली आहे
मुंबई उच्च न्यायालयाच्या   आदेशाप्रमाणे आधी सभापतीची निवड करा नंतर सभा घ्या ,मात्र सचिव राजेश भुसारी यांनी ३ ऑगस्ट रोजी संचालक मंडळाची सभा घेतली ,या सभेमध्ये   जिल्हा निवडणूक अधिकारी नसताना अध्यक्षांची निवड संचालकांनी केली , सभापतींचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी पुन्हा निवडणूक लावतात त्यानंतर सभापतीची निवड होते आणि नंतर सभा व   उपसमितीची बैठक घेण्यात येते ,मात्र आता उपसमितीच्या सभेसाठी पण तयारी सुरु करण्यात येत आहे , उपसमितीच्या सभेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा प्रस्ताव ठेवला जातो आणि   नंतर बोर्डमधून मंजुरी मिळते. मात्र मुंबई APMC मध्ये   बोर्ड नसताना उपसमितीच्या सभेची बैठक लावण्याचा हेतू काय ? अशी चर्चा बाजार आवारत सुरू आहे .  
-काय आहेत उपसमिती सभा ...
उपसमितीमध्ये बांधकाम , कार्यकारी   ,सेवक ,नियमन अनुज्ञप्ती आणि वांदा समिती असे एकूण ५ प्रकारआहेत. या समितीचा अध्यक्ष संचालक मंडळातून निवडला जातो .
येणाऱ्या २१ आगस्ट रोजीच्या उपसमिती सभेमध्ये पाचही   मार्केटच्या कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या खर्चाची मंजुरीची तयारी करण्यात आल्याची समजते, यामध्ये बांधकाम ,रस्ते ,मार्केटची   पुनर्बांधणी ,अनुज्ञप्ती ,सेवक सह इतर कामांना मंजुरी देण्याचा   तयारी आहे , सूत्रानी सांगितल्याप्रमाणे उपसमिती सभेमधे महत्वाचे विषय , बदली आणि मलाईदार   विषयसूची ठेवण्यात आली आहे ,यासाठी   काही संचालकांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारासोबत   वन टू वन बैठक सुरू केल्याचे समजते ,म्हणजे ८ महिन्याच्या वनवास पूर्णपणे संपला नाही , मात्र एकच सभा घेवून   मार्केटच्या तिजोरीवर डल्ला मारण्याची तयारी जोरात सुरु झाली आहे , सूत्रानी सांगितल्याप्रमाणे APMC च्या संचालक मंडळावर   लवकरात लवकर शासन नियुक्त संचालक मंडळ येणार आहे ,त्यानंतर   सभापती व उप सभापतीच्या निवडणूक होणार आहेत. मुंबई APMC मध्ये   सध्या १८ संचालकांपैकी   १६ संचालक आहेत ,या संचालकांमध्ये जवळपास ११ संचालकांना मुंबई हायकोर्टातून तात्पुरती स्थगिती आहे ,   या सर्व गोष्टीवर   पणन मंत्री व पणन संचालक काय निर्णय घेणार याकडे सर्व बाजार घटकाची लक्ष्य लागली आहे.