मुंबई APMC सॉफ्टवेयर इंजिनियर तरुण शेतकरी नोकरीपेक्षा शेतीतून वर्षात कमवतोय 40 लाख रुपये! आले शेतकऱ्याची प्रेरणा देणारी यशोगाथा
 
Satara Farmer Success Story :  माणूस कितीही शिकला आणि नोकरी करत असला तरी तो शेतीमध्ये योग्य पद्धतीने नियोजन करून चांगला नफा कमावू शकतो हे जाबली तालुक्यातील हुमगांव येथील ओमकार शिंदे यांनी दाखवून दिले आहे.त्यांनी आपले M.E कंप्यूटर साइंस   शिक्षण पूर्ण केले . कृषी क्षेत्रातील कुठल्याही पदवी   नसताना सुद्धा आज नोकरी सह शेती करून कशाप्रकारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावता येईल याचे उत्तम उदाहरण ओमकार शिंदेच्या   रूपाने आज पाहायला मिळत आहे. ते सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधे सॉफ्टवेअर इंजिनियर पदावर   नोकरी करत असून शेतीमध्ये त्यांनी नवनवे प्रयोग केले आहेत. नोकरी सांभाळत त्यांनी आल्या मधून भरघोस उत्पादन काढले आहे.   शेतीमध्ये अडचणी येतात पण योग्य व्यवस्थापनाने शेती यशस्वी करता येते हे त्यांच्या प्रवासातून दिसून येते. कोण आहे हा तरूण आणि काय आहे त्याची शेतीची पद्धत जाणून घेऊया.
सातारा जिल्ह्यातील हुमगाव येथील ओंकार शिंदे हे APMC मधे सॉफ्टवेअर इंजिनियर पदावर काम करत आहेत. ते आठवड्यात ५ दिवस बाजार समितीत काम पाहतात तर दर शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी गावात शेती करतात. ओंकार शिंदे यांना लहापणापासूनच शेतीची आवड असल्यानं शेतामध्ये त्यांनी वेगवेगळया प्रकारे प्रयोग सुरु केले. वेळेअभावी शिंदे यांनी गव्हाच्या शेतीपासून सुरुवात केली होती पुन्हा त्यांनी आधुनिक शेतीकडे वळायचे ठरवले. मार्केट अभ्यासून आल्याची निवड बाजारात असलेली मागणी, दर, उत्पादन, हवामान आदी बाबींचा अभ्यास केल्यानंतर आले हे पीक ओंकार यांच्या पसंतीस उतरले. आणि आल्याची शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि आल्याची शेती करायला सुरुवात केली.या सर्व कामांमध्ये त्यांना त्यांच्या पत्नीचे ही मोठे सहकार्य आहे विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी पेशाने डॉक्टर आहेत. आता त्यांना आल्याच्या शेतीमध्ये चांगलं उत्पन्न सुद्धा मिळत आहे. दोन एकर आल्या मधे ७५ ते ८० गाड्यातून ३५ ते ४० टन आल्याचे उत्पन्न झाले आहे. यामध्ये ओंकार शिंदे यांचे चुलते नवनाथ शिंदे देखील देखभाल करत असतात. एकत्रित कुटुंब असल्याने सर्वांच्या मदतीने शिंदे कुटुंब आणि चांगली शेती फुलविली आहे.