मुंबई APMC टॉयलेट घोटाळा ; 3 अधिकारी निलंबित : कुठे चुकलो? काय शिकलो?
 
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील शौचालय घोटाळ्यात १० जणांवर गुन्हे दाखल झाले असून   यामधील दोन कंत्राटदार तळोजाच्या तुरुंगात आहेत, तर एकाला अंतरिम जामीन मिळाली असून उरललेल्या ७ जणांवर जामिनाची टांगती तलवार आहे.
नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखाने गुन्हा दाखल झाल्यापासूनच चौकशीचा सपाटा लावला आहे , यामध्ये अजुन २० आजीमाजी अधिकारी व कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे .
२० दिवसांपासून मार्केट संचालक व शेतकरी प्रतिनिधी मार्केट आवारत फिरकले नाहीत, ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस या मार्केट संचालक व शेतकरी प्रतिनिधिंना फायदा पोहचवण्यासाठी काम केलं,   त्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांना अश्या परिस्थित वाऱ्यावर सोडलं जात आहे का? व बाजारसमिती मध्ये मागील २० दिवसापासून जे काही घडत आहे, ते   सर्व संचालकाना माहिती असून सुद्धा या प्रकरणाकडे जाणून बुजून   दुर्लक्ष केलं जात असल्याची चर्चा सुरु आहे   .
रात्रंदिवस चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना   क्राईम ब्रांच ते मुख्यालय अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे .मात्र कुठलेही संचालक व शेतकरी प्रतिनिधी २० दिवसापासून बाजार आवारत   फिरकलेच नाहीत.या आधी काहीही काम नसताना देखील काही संचालक आपल्या ठरावीक लोकांना बोलवून सभापतींच्या दालनामध्ये ठाण मांडून बसत होते, मात्र ज्यावेळी हे अधिकारी व कर्मचारी अडचणीत आले, त्यावेळी हे संचालक व शेतकरी प्रतिनिधी लांबून त्यांचा तमाशा पाहत होते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कोणी साथ दिली? व कोणी नाही दिली? यावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडा घ्यायलाच पाहिजे.
मार्केट मधे शिस्तबद्ध काम करण्यासाठी ज्यावेळी कोणी अधिकारी व कर्मचारी नियमीत काम करून घेण्याची तयारी करतात, त्या अधिकाऱ्याना साथ देणे आवश्यक आहे , कुठलीही मोठी अडचण निर्माण झाली तर आपल्या मागे हेच अधिकारी   उभे असतात, त्यामुळे अशा वापर करणाऱ्या मार्केट संचालकांच्या मागे राहू नका, नाही तर येणाऱ्या काळात ते निघून जाणार आणि तुम्ही अडचणीत सापडणार.
१ दिसंबर रोजी मुख्यालयात झालेल्या संचालक मंडळांच्या सभेत धोरणात्मक निर्णय सोडून पणन संचालकांनी उप अभियंता मेहबूब व्यापारी यांच्यावर उचित कारवाई करुन अहवाल सादर करण्याच्या पत्रावर झालेली चर्चा वादळी ठरली असल्याची समजते, त्यामुळे ही संचालक मंडळाची सभा नक्की कोणासाठी घेतला जात आहे? तसेच २० दिवसापासून सायलेंट मोडवर असणारे मार्केट संचालकांना आता जाग कशी आली? अशी चर्चा बाजार घटकामध्ये सुरु आहे .