मुंबई APMC होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आवक होऊन सुद्धा भाजीपाल्याचें दरात वाढ ;उप सचिवाचं दुर्लक्ष
 
Mumbai APMC Vegetable Market: मुंबई APMC   होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज ६४५ गाड्याची आवक होऊन सुद्धा भाज्यांचे दरात वाढ आहे . मार्केटमध्ये   कोथिंबीर 15ते 20 रुपये,मिरची लवंगी   30 ते 35   रुपये,मिरची ज्वाला ५० ते ६० रुपये, कोबी 30 -35 रु , टोमॅटो 35 ते 40 रुपये,काकडी 32 ते 35 रु, वांगी 60 ते 70 रुपये प्रतिकिलो आहेत. भेंडी 50 ते 55 रु, शिमला मिरची 50- 55 रु , कारली 60 ते 65   रु , गाजर 50- 55 रु, कांदापात 15-10 रु, वाटणा 28-30 रुपये ,मेथी 14-22 रु ,फ्लॉवर 50 ते 55   रु, गवार   80 -85 रु व आले 70-90 रु ,फरसबी 40 ते   50, भुईमूग शेंग 90 ते 100 रुपये प्रतिकिलो विक्री केली जात आहे.
मुंबई एपीएमसी घाऊक भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाल्याचे दरात वाढीच्या फटका शेतकरी व ग्राहकांना असून व्यपाऱ्याना फायदा होत असल्याची चित्र सध्या बाजार आवारात दिसून येत आहे ,त्यामुळे भाजीपाला मार्केटमध्ये बाजार समितीच्या नियंत्रण राहिलेले नाही ,बाजार आवारात शेतमालाची विक्री करणाऱ्या शेकडो अवैध व्यपाऱ्यामुळे दरात वाढ होत आहे, या दर वाढीच्या फटका शेतकरी ,ग्राहक व बाजारसमितीला असून ठराविक व्यपाऱ्याना होत आहे.त्यामुळे घाऊक बाजारात अवैध पणे किरकोळ विक्री करणाऱ्या संख्या दिवसेदिवस वाढ होऊ लागली आहे.   त्यामुळे शेतकऱ्याकडून कमी दरात भाजीपाला आणून बाजार आवारात जास्त दराने विक्री केला जात आहे यावर वेळोवेळी पणन संचालकांकडून पत्र   देऊन सुद्धा भाजीपाला मार्केट उप सचिव पणन संचालक व सचिवांना दिशाभूल करत आहे . मार्केट संचालक ,उप सचिव ,सुरक्षा अधिकारी व मापाडी यांच्या अभद्र   युतीमुळे बाजार भावात तफावत सह शेतकरी ,ग्राहक व बाजार समितीला मोठा नुकसान होत आहे . यावर पणन संचालक व सचिव काय निर्णय घेणार याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष लागली आहे .