मुख्यालय अभियंतामुळे मुंबई Apmc परिसरात उद्यानांची दुरावस्था
मुख्यालय अभियंतामुळे मुंबई Apmc परिसरात उद्यानांची दुरावस्था 
- मुंबई Apmc प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार
- परिसर चांगला राखण्याच्या नावाखाली लाखो   रुपयांचा चुराडा.
- आशियाखंडातील मुंबई Apmc बाजारपेठेची उद्याने सुकली
सचिव राजेश भुसारी या समस्येवर तोडगा काढतील का ?
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या   मुख्य प्रशासकीय इमारत आणि प्रवेश द्वार चांगला रहावा यासाठी अनेक हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रतिवर्षी लाखो रुपये खर्च करून उद्यानांची निर्मिती करण्यात आली. भूमिपूजन व लोकार्पणासाठीं   लाखो रुपये खर्च करण्यात आले .परंतु फोटोत दिसणारे संचालक मंडळ त्यांनतर उद्यानांकडे दिसले नाहीत त्यांनी   पूर्णपणे पाठ फिरवली म्हणून पाण्यासारखा पैसा खर्च करून देखील याचा काहीही उपयोग झाला नाही. उद्यानासाठी खर्च केलेल्या लाखो रुपयांच्या   निधीचा चुराडा झाला आहे. त्यामुळे बाजार घटकांनी नाराजी व्यक्त करीत याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. नक्की उद्यानांची   कशा प्रकारे दुरावस्था झाली आहे ते पाहुयात या व्हिडिओ मध्ये ....  
आशिया   खंडातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या   मुंबई apmc मार्केटच्या प्रशासकीय इमारतीच्या   प्रवेशद्वाराजवळील असलेल्या उद्यानाचे   गवत पूर्णपणे सुकले आहे..परिसरातील गवतांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने त्यांची दुरावस्था झाली असून गवताचा हिरवाळपणा नष्ट झाला आहे ...गवतांना जेट स्प्रे ने पाणी मारण्याऐवजी टँकर मध्ये पाणी भरून बादली ने पाणी मारले जात आहे.. यामुळे मुबलक प्रमाणात गवताला पाणी न मिळाल्याने प्रशासकीय इमारतीलगत असलेल्या उद्यानाची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे ..   मुख्यालय अभियंता जाणून बूझून उद्यान उद्वस्त करत आहे का ? अशी चर्चा सर्वत्र बाज़ार आवारत होत आहे ..मार्केट संचालक ज्या प्रकारे स्वतःची शोभा वाढवण्यासाठी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर   लावतात , त्याच प्रमाणे उद्यानाचीदेखील शोभा वाढावी ,निसर्ग सुंदर राहावा ,व परिसराची देखभाल करावी. त्यामुळे APMC मधील वातावरण देखील चांगले राहील असे बाजार घटक सांगत आहेत.