मुंबई APMC मार्केट पुनर्विकासाच्या नावाखाली व्यापाऱ्यांना बाहेर काढण्याचा डाव; मार्केट अभियंत्यावर व्यापाऱ्याचा गंभीर आरोप
 
-कोट्यवधी रुपयांची जागेवर आता मंत्री ,सभापती आणि अधिकाऱ्याचे नजर!
Apmc Redevelopment: राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार एकीकडे   मुंबई APMCमधील अति धोकादायक असलेल्या   कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्विकासासाठी मॅराथॉन वैठक घेत आहेत तर   दुसरीकडे मार्केटमध्ये जंग लागलेले टेकू लावण्याची कामे केली जात आहेत , हे जंग असलेले टेकू लावून मार्केटमध्ये मोठी दुर्घटना घडवण्याचे डाव रचले जात आहेत, मोठी दुर्घटना घडल्यास व्यापाऱ्यांना वाहेर काढता येऊ शकते, त्यामुळे काही दिवसापासून टेकू लावण्याची कामे सुरु आहेत. हे टेकू लावून बाजार समितीच्या तिजोरीतून लाखो रुपयांचा डल्ला मारण्याचे काम मार्केट अभियंता व कंत्राटदाराने सुरु केले आहे . मार्केटमधे जिथे टेकू लावण्याची आवश्यकता नाही त्याठिकाणी मार्केट अभियंत्यांने टेकू लावण्यासाठी काही ‘दलाल’ नियुक्त केले आहेत. मार्केटमधे ५० ते ६० टक्के धक्याचा   छज्जा झुकलेला आहे तो कधीही कोसळू शकतो, मात्र याठिकाणी टेकू न लावता दुसरयाच ठिकाणी लावण्यात येत आहे , यावरून मार्केट अभियंत्याचा भोंगळ कारभार समोर आला आहे . दुसरीकडे   मार्केटच्या पुनर्विकासासाठी सभापती ,मार्केट संचालकांकडून बोगस अभियंतामार्फत दलाल नियुक्ती करून असे जंग लागलेले टेकू लावून मोठी दुर्घटना   घडवण्यासाठी डाव रचले जात आहेत, दुर्घटना घडवून व्यापाऱ्यांना वाहेर काढण्याचा नवीन हातखंडा अभियंतांमार्फत केला जात आहे अशी   माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे .   त्यामुळे नवीन सचिवांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी देखील व्यापाऱ्याकडून केली जात आहे .
कांदा बटाटा मार्केटचे व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले की, मार्केट अभियंता कधीही   कैबिन सोडून वाहेर येत नाही , मार्केट संबंधित तक्रार असल्यास अभियंताने ठेवलेल्या दलाला मार्फत थातुर मातूर कामे केली जातात, या दलालाकडून मार्केटची छोटी मोठी कामे करण्यासाठी तुर्भे नाक्यावरून कामगार आणले जातात व ते बिल अभियंता पास करतो , असाच   कारभार मार्केटमध्ये १५ वर्षापासून सुरु आहे. जवळपास १५ वर्षापूर्वी लावण्यात आलेल्या टेकूलाच दर महिन्याला बाजार समितीच्या तिजोरीतून भाडे दिले जाते. जुनाच टेकू वापरून नवीन टेकूसाठी पैसा घेतला जातो. अभियंताने ठेवलेल्या 'कंत्राटदार कम दलाला' कडून सदर कामे केली जातात, त्यामुळे बोगस अभियंतामुळे मार्केटचे नाव   खराब झाले असून त्यांची हकालपट्टी करने गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.