तांदळाची निर्यात बंद करून सुद्धा दरात वाढ. केंद्राच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा की तोटा? सर्वसामान्यांवर काय परिणाम?
नवी मुंबईः सध्या सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत असतानाच तांदळाच्या   वाढत्या किंमती पाहून केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून तांदळाच्या किंमती वाढत होत्या, त्यामुळे केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या किंमती पाहून   मोठा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे . एकीकडे बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के कर लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे   तांदळाच्या निर्यातीवरही बंदी   घालण्यात आली आहे. निर्यात बंद होऊन सुद्धा मुंबई APMC होलसेल मार्केटमध्ये बासमती तांदळासह सर्व तांदळाची दारात १० ते १५ टाक्यांनी वाढ झाली आहे .
मुंबई APMC धान्य मार्केट मध्ये आज जवळपास २४० गाड्याची   आवक झाली आहे. मार्केटमध्ये सर्व तांदळाच्या दरात १० ते१५ टाक्यांनी वाढ झाली आहे तर किरकोळ मार्केटमध्ये दुप्पट दराने तांदूळ विकला जात आहे .. पाहूया धान्य मार्केट मध्ये तांदळाची दर
होलसेल मार्केटमध्ये बासमती तांदूळ ८0 ते ११५ रुपये   किलो 
साधा तांदूळ   ३५ ते ५० रुपये किलो 
कोलम तांदूळ ४० ते ६० रुपये किलो
मोगरा तांदूळ ३५ ते ४० रुपये किलो
दुबार तांदूळ   ५२ ते ७२ रुपये किलो  
तिबार तांदूळ ६० ते ७५ रुपये किलो .
त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्यात बंदीचा फायदा नक्की   कोणाला होत आहे? असे प्रश उपस्थित होत आहेत.