Mumbai Apmc धान्य मार्केटमधे डाळी, कडधान्यांची दहा रुपयांनी दरवाढ
मुंबई apmc धान्य मार्केटमध्ये यंदा कडधान्य आणि डाळींची आवक कमी झाल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात मूग , मसूर तूर डाळ तसेच मटकीच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली आहे.
श्रावण महिना सुरु झाल्यामुळे अनेकांनी मासांहर वर्ज्य केला आहे. अशातच आता सणांना देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे भाज्यांसोबतच गृहिणींनी डाळींकडे मोर्चा वळवला आहे. मात्र, मागणी वाढली असताना एपीएमसी धान्य मार्केटमध्येकडधान्य आणि डाळींची आवक घटली आहे. अवकाळी पाऊस तसेच कडक उष्णतेमुळे कडधान्य आणि डाळींचे उत्पादन घटले आहे. परिणामी, मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
सध्या श्रावण सुरु असल्याने मांसाहार करता येत नसल्याने शाकाहारी जेवणात भाज्यांबरोबर च डाळींच्याहि दारात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
पाहूया धान्य मार्केट मध्ये डाळींचे दर
तूर डाळ ७३-१४३ रु किलो 
मसूर डाळ ५६ ते ६८ रु किलो 
मूग डाळ ९५ ते १०३ रु किलो 
उडीद डाळ ८४ ते ११४ रु किलो 
चना डाळ ६२ ते ७०रु किलो 
राजमा ११० ते १४२ रु किलो 
कबुली चना ९०-१८०