मुंबई APMC भाजीपाला बाजारात भाजीपाल्याचे दर महागले
Mumbai Apmc Vegetable: यंदा देशात मान्सून उशिरानं दाखल झाला. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम शेतीवर झाला आहे. अवकाळी पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं होतं. त्यातच उशिरानं दाखल झालेल्या पावसामुळं भाजीपाल्याच्या दरावर त्याचा परिणाम झाला आहे.   मुंबई apmc भाजीपाला बाजारात भाजीपाल्याचे दर महागले आहेत. मार्च एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा भाजीपाला शेतीला मोठा फटका बसला. भाजीपाला उत्पादकांना त्यावेळी मोठा फटका बसला. सध्या बाजार समित्यांमध्ये टोमॅटो, आले, हिरवी मिरची, कोथिंबीर, वाटाणा, बीन्सचा दर १००   ते २००   रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
मुंबईतील काही विक्रेत्यांनी कोथिंबीरची दररोजची खरेदी थांबवली आहे. मुंबईत कोथिंबीरचा दर एका किलोला साधारणपणे १०० रुपये असतो. मात्र, यावेळी एका किलोचा दर ३०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. २० ते ४० रुपयांना मिळणारी जुडी आता ६० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
आल्याचा सर्वसाधारण दर १०० रुपयांपर्यंत असतो. मात्र, यावेळी आल्याचा दर २५० ते ३५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हिरव्या मिरचीचा दर देखील १०० रुपये किलोंच्या जवळ असतो तो देखील २०० ते ३०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे कोथिंबीर देखील १०० रुपये किलो मिळते यावेळी ती ३०० रुपयांवर पोहोचली आहे. फ्रेंच बीन्स चा दर सामान्यपणे बाजारात १२० ते १६० रुपयांदरम्यान असतो. तर, सध्या दर २५० रुपये आहे.
भाजीपाल्याचे दर वाढल्यानं नागरिकांनी राज्य सरकारनं महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं म्हटलं. २०१३ मध्ये भाजीपाल्याचे दर वाढल्यानं राज्य सरकारनं रास्त दरात भाजीपाला विक्री केंद्र काढली होती. त्याला अपना बाजार आणि सहकारी भाजी विक्री केंद्र काढली. त्यावेळी भाजीपाल्यानं १०० रुपयांचा दर ओलांडला होता.