मुंबई APMC फळ मार्केटमध्ये देशी फळांची आवक वाढल्याने दरात वाढ
 
-फळ मार्केटमध्ये जवळपास ३०० गाड्यांची आवक
-फळांची मागणी वाढल्याने फळांच्या दरात २० ते ३० टक्क्यांची वाढ
-लिची ,स्ट्राबेरी ,सीताफळ ,द्राक्ष ,अननस ,सफरचंदची मागणी वाढली
Mumbai Apmc Fruit Market : मुंबई APMC फळ बाजारात संत्री, मोसंबी, पेरू, सीताफळ, द्राक्षे, सफरचंद, पपई, कलिंगड, अननस ,स्ट्राबेरी ,लिची यांसारख्या देशी फळांची आवक वाढायला सुरुवात झाली आहे. त्यांना चांगली मागणी असल्याने गेले काही दिवस थंडावलेल्या बाजारात आता पुन्हा उत्साह निर्माण झाल्याचे चित्र आहे.
थंडीचा हंगाम सुरू झाला आहे आणि वातावरणही आनंद दायक झाले आहे. त्यामुळे आता भाजीपाला आणि फळांचेही चांगले उत्पादन होऊ लागले आहे. परिणामी बाजारात उत्तम दर्जाची   फळे दिसू लागली आहेत... फळांची मागणी वाढल्याने फळांच्या दरात २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. आता फळ बाजार विविध प्रकारच्या फळांनी सजले आहे.. नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये आज जवळपास ३०० गाड्यांची आवक झाली आहे . १० जानेवारी २०२४ च्या फळांचे घाऊक दर (किलोमागे) काय आहे पाहूया या रिपोर्टमध्ये
फळमार्केटमध्ये सफरचंद ८०   ते १२० रुपये, डाळिंब ८० ते १३० रुपये, हिरवे द्राक्ष   ८० ते १०० रुपये किलो , संत्री ४० रुपये , अननस ४० ते ५० रुपये , पपई २५ रुपये किलो , कलिंगड १५ रुपये किलो ,अंजीर ६० ते ८० रुपये किलो , पेरू ३५ ते ४५ रुपये किलो ,चिकू ३० ते ४० रुपये किलो ,मोसंबी ३० ते ३५ ,लिची २५० ते ३०० रुपये किलो , स्ट्राबेरी १५० ते २००,सीताफळ ६० ते ८० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे . लिचीला खवय्यांची पसंती असून मार्केटमध्ये   बिहार, पश्चिम बंगालमधून आलेली लिचीही खवय्यांच्या पसंतीस उतरत असून घाऊक बाजारात २५० ते ३००   रुपये किलोने लिचीची विक्री होते आहे.