मुंबई APMC प्रशासन संचालक मंडळ विना करू शकतो मान्सूनपूर्वी कामे
नवी मुंबई : मुंबई APMC मध्ये संचालक मंडळाच्या कोरम पूर्ण न झाल्याने सध्या संचालक मंडळावर टांगती तलवार आहे . संचालक मंडळाच्या वैठक होत नसल्याने बाजार समितीचे धोरणात्मक निर्णय होत नाही असे सांगण्यात येत आहे, मात्र   यावर मार्केटचे जाणकार सांगतात कि APMC प्रशासन मान्सूनपूर्वी कामे पणन संचालकांच्या मंजुरी घेउन करू शकतो. 
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे   विद्यमान संभापती अशोक डक आणि उप सभापती धनंजय वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाची मुंबई APMC मार्केटवर अडीच वर्ष सत्ता होती . या अडीच वर्षात संचालक मंडळाकडून   जवळपास ३० ते ५० बैठक घेणयात आलं .   यामध्ये कांदा बटाटा मार्केटमधील   २० वर्षांपासून अति धोकादायक गाळ्यावर व्यापार, मसाला मार्केटमध्ये सेंट्रल फॅसिलिटी इमारत अति धोकादायक . मसाला मार्केटमधील रस्ते ,गटार ,विद्युत ,सीसीटीव्ही ,कांदा बटाटा मार्केटमधील रस्ते ,ड्रेनेजलाईन , फळ मार्केट मधील बहुउद्देशीय इमारत ,मार्केट मधील व्यपाऱ्याकडून झालेले अनधिकृत बांधकाम ,मार्केट मधील जवळपास १५० कोटीच्या प्रकल्प पाडून राहिले ,तसेच बाजार समिती मध्ये सेस वसुली ,शेतकरी ,वयापारी व माथाडी कामगारांसाठी नवीन उपायोजना अशेच बऱ्याच चर्चा या अडीच वर्षात झाली मात्र काम शून्य ..आता सांगण्यात येत आहे कि ४ महिन्यापासून संचालक मंडळ नसल्याने मान्सूनपूर्वी कामे आणि धोरणात्मक निर्णय पूर्णपणे ठप्प आहे ,जे अडीच वर्ष राहून काही विकासकामे केली नाही तर आता काय करणार काही संचालक आपल्या फायदासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी   पब्लिसीटी   करीत आहे, अशी चर्चा बाजार आवारात सुरु आहे.
 
बाजार आवारात   पावसाचे पाणी साचू नये म्हणून प्रशासनाकडून   मान्सूनपूर्व कामे यामध्ये नालेसफाई, वृक्ष छाटणी, विद्युत कामे, रस्त्यांची डागडुजी केली जाते. एप्रिलमध्ये सुरुवात होऊन मे अखेरपर्यंत कामे पूर्ण होणे अपेक्षित असते.   महापालिकेकडून   नालेसफाई कामे सुरू झाली असून आतापर्यंत ७० ते ८० टक्के   कामे पूर्ण झाली आहेत.आधीच पावसाळ्यात एपीएमसीमध्ये खड्डेमय रस्त्यांनी पाणी साचते, मात्र एक महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला असून अद्यापपर्यंत एपीएमसीतील नालेसफाईला सुरुवातही झालेली नाही. त्यामुळे एपीएमसीमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये सांगण्यात येत आहे कि संचालक मंडळ नसल्याने कामे ठप्प आहे मात्र मान्सूनपूर्वी कामे संचालक मंडळ विना प्रशासन करू शकतो . Apmc प्रशासन कडून बाजार आवारत लाखो रुपये खर्च करून दरवर्षी   मान्सूनपूर्वी कामे केला जातो ,पाऊस सुरू झाली की मार्किट पाण्यात जातो यामध्ये काम कशी चालतो यावर दिसतात .सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेश भुसारी   आठवड्यात ३ दिवस APMC तर ५ दिवस नागपूर अशे दौरा सुरु आहेत त्यामुळे मार्केटमध्ये मान्सूनपूर्वी कामे रखडले आहेत यावर सचिव राजेश भुसारी लवकरात लवकर काही निर्णय घेण्याची गरजेचे आहे नाही तर या मन्सूनमध्ये मार्केट जाणार   पाण्यात