Sameer Wankhede Case Update: 'अतिक अहमदसारखा माझ्यावर देखील...',समीर वानखेडेंची मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी
मुंबई: आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये सीबीआयने एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. एकीकडे समीर वानखेडे यांना याप्रकरणात मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला होता तर दुसरीकडे त्यांना त्यांच्यावर आता हल्ला होण्याची भीती आहे. गँगस्टर आतिक अहमदसारखी माझी परिस्थिती होईल असा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे. यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
समीर वानखेडेंनी दावा केला आहे 'अतिक अहमदसारखा माझ्यावर देखील हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला सुरक्षा देण्यात यावी', असं वानखेडे यांनी म्हंटलं आहे. हल्ला होण्याची भीती व्यक्त करत समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कुख्यात गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजच्या बाहेर 15 एप्रिलला ही घटना घडली होती.
समीर वानखेडे यांनी आर्यन खान ड्रग्जप्रकरणी मुंबई हायकोर्टात रिट पिटीशन दाखल केली होती. याप्रकरणी सध्या मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 22 मेपर्यंत अटक न करण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते. तसंच आज समीर वानखेडे यांना अटक होणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकीऑगस्ट महिन्यामध्ये समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. समीर वानखेडे यांना ट्विटरवर धमकीचा मेसेज आला होता.