मुंबई Apmc होलसेल मार्केटमधील शेतमालाची Top 5 बातम्या
१) मुंबई apmc कांदा बटाटा होलसेल मार्केटमध्ये कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज मार्केटमध्ये कांद्याच्या १०२ गाड्यांमधून २० हजार ९७२ गोनी कांद्याची आवक झाली असून कांद्याचा भाव १४ ते २० रुपये प्रतिकिलो इतका आहे. बटाट्याच्या ४९ गाड्यांमधून २४ हजार ३०० गाड्यांची आवक झाली असून बटाट्याचा भाव १६ ते १८ रुपये प्रतिकिलो आहे. तर आज मार्केटमध्ये लसणाच्या ०९ गाड्यांमधून २ हजार ४१० गोनी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर ९० ते १२० रुपये प्रतिकिलो आहे.
२) होलसेल फळ मार्केटमध्ये सर्वात जास्त आवक हि सफरचंद व मोसंबी या फळांची
मुंबई apmc होलसेल फळ मार्केटमध्ये सर्वात जास्त आवक हि सफरचंद व मोसंबी या फळांची झाली आहे. सफरचंदाचा भाव १०० ते १३० रु प्रतिकिलो आहे, तर ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो आहे.
३) भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये भाज्यांचा दरात वाढ तर टोमॅटोच्या दरात घसरण
मुंबई apmc भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये आज ६४१ गाड्यांची आवक झाली असून सर्वच भाज्यांचा दरात वाढ दिसून येत आहे. मात्र मार्केटमध्ये आज बऱ्याच दिवसांनी tomatoच्या दरात घसरण दिसून येत आहे. tomatoचा दर आज   ८० - ९० रु प्रतिकिलो आहे. मार्केटमध्ये आज आल्याचा दर १२० ते १३० रुपये प्रतिकिलो आहे. तर कोबी , कारली , फ्लॉवर, काकडी इत्यादी भाजीपाला ३० रु प्रतिकिलो ने विकला जात आहे.
४) होलसेल मसाला मार्केटमध्ये   जीर, मोहरी, हळद यासारखे मसाल्याचे जिन्नस महागले 
मुंबई apmc होलसेल मसाला मार्केटमध्ये आज तीळ १६० ते २०० रु प्रतिकिलो आहे . साखर ३५ ते ३८ रु प्रतिकिलो आहे. तर गुळाचा दर ४८ ते ५० रुपये इतका आहे. तसेच मार्केटमध्ये जीर, मोहरी, हळद या सारख्या मसाल्याच्या जिन्नस मध्ये देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मार्केटमध्ये आज काजू ६०० ते ८०० रु प्रतिकिलो आहे तर बदाम ७५० ते ८०० रुपये प्रतिकिलो ने विकला जात आहे.
५) होलसेल धान्य मार्केटमध्ये सर्वच डाळींच्या दरात वाढ शेंगदाणा ११० ते १२० रुपये प्रतिकिलो
मुंबई apmc होलसेल धान्य मार्केटमध्ये तुरडाळीचा दर आज १२० ते १५० रुपयांवर गेला आहे. तर मुगडाळ , मसूर डाळ, उडीद या सगळ्याच डाळींच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. श्रावण महिन्यातील उपवासामुळे शेंगदाण्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. मार्केटमध्ये आज शेंगदाणा ११० ते १२० रुपये प्रतिकिलो आहे.