धक्कादायक ! 9 वर्षीय अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणारे नराधमाला मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधून अटक

एपीएमसी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी विनोद कुमार पांडे यांना राहत असलेल्या भाजीपाला मार्केट D विंग गाला नंबर 554 मधून केला अटक
मुंबई APMC भाजीपाला मार्केट बनला धर्मशाळा मार्केट संचालक व प्रशासन कारणीभूत
मार्केट संचालक यांच्या आशीर्वादाने गाळ्यावर अनधिकृत शेतमालाची व्यापार आणि बाजार आवारत अनाधिकृतपणे वास्तव
बाजार आवारत अनधिकृत शेतमालाची वायपर करणाऱ्या कडून लाखो रुपयांची वसुली
भाजीपाला मार्केटमधे गुटखा ,गांजा ,अमलीपदार्थ ,हत्या आता अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारे लोकांचा वास्तव
नवी मुंबई : मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधे राहणारे एका नराधमानं 9 वर्षीय अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. या प्रकरणात एपीएमसी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी विनोद कुमार पांडे यांना राहत असलेल्या भाजीपाला मार्केट D विंग मधून अटक केली आहे .
एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील राहणारे एक 9 वर्षीय अल्पवयीन मुलगी सामान आणण्यासाठी दुकानात गेली असता, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या विनोदकुमार केदारनाथ पांडे याने अल्पवयीन मुलीला आईस्क्रीमचे अमिष दाखवले, पीडित मुलीने त्याला नकार देऊन दुकानाबाहेर येण्याचा प्रयत्न केला.मात्र त्या नराधमाने तिला मध्येच अडवून बाहेर येऊन न देता तिच्या गालाचे चुंबन घेऊन तिला त्याच्यासोबत येण्यासाठी जबरदस्ती करत होता. पीडित मुलीने संघर्ष करत तेथून पळ काढला व घरी गेल्यावर घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितल्यावर, पालकांनी नराधम विनोदकुमार पांडे याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी विनोदकुमार पांडे, वय 34 वर्ष, राहणार मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केट D विंग , मुळ राहणार उत्तर प्रदेश, यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यावर विविध पुरावे जमा करून, आरोपीला न्यायालयात हजर केले, व अवघ्या 18 तासातच दोषारोप पत्र दाखल करून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता भाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक ढमाले, पोलीस हवालदार दत्ता कदम, व हवालदार ताम्हणे यांनी सदरची कामगिरी केल्याने आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली.