धक्कादायक - मुंबई APMC मार्केटमध्ये शेतकऱ्याची थकबाकी ठेवणाऱ्या व्यपाऱ्याच्या लायसंसचे नूतनीकरण !
Apmc News: मुंबई   APMC भाजीपाला मार्केट मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे   शेतकऱ्याच्या शेतमालाची थकबाकी ठेवणाऱ्या   व्यपाऱ्याचे लाइसेंन्स   नूतनीकरण apmc प्रशासनाकडून करण्यात आले आहे . भाजीपाला मार्केट मधील डि -५०९   गाळ्यावर बरेली मधून शेतकरी संग्रीव मोर्या यांनी जवळपास ९० हजार रुपयाची कोबी पाठवली होती . मात्र शेतमालाची थकबाकी मिळाली नसल्याची तक्रार मोर्याने भाजीपाला मार्केट उप सचिव कडे केली होती . शेतकऱ्याची तक्रार आल्यावर संबंधित व्यपार्याकडून या शेतकरयाला शेतमालाची थकबाकी देणे अपेक्षित आहे .मात्र शेतकऱ्यांची थकबाकी ठेवणाऱ्या या व्यापाऱ्यांच्या संपलेल्या लाइसेंन्सची नूतनीकरण करण्यात येत आहे ,यामध्ये असे दिसून येत आहे कि बाजार समितीचे उप सचिव शेतकरी व ग्राहकांसाठी नाहीत तर   व्यपाऱ्यासाठी आहेत . ज्यावेळी शेतकऱ्याच्या मालधनि तक्रारी येतात तेव्हा लवकरात लवकर थकबाकी व्यपार्याकडून वसुल करण्याची जबाबदारी मार्केट उप सचिवांकडे असते ,मात्र असे कितीतरी शेतकरी तक्रार करून सुद्धा त्याची थकबाकी व्यपार्याकडून मिळत नाही. काही शेतकरी ज्यावेळी मालधनी तक्रार करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना कर्मचाऱ्याकडून उलट सुलट उत्तर मिळते व त्यांना निराश होऊन परतावे लागते असे काही शेतकऱ्यानी सांगितले . शेतकऱ्याची थकबाकी ठेवणार्या त्या व्यपाऱ्याना बोलावण्यात येते. त्यानंतर   ,संबंधित   अधिकारी ,कर्मचारी व   सुरक्षा अधिकारी त्या व्यपाऱ्यासोबत सेटलमेंट करतात   .अशी माहिती सूत्रांनी दिली आहे .
कायद्यामध्ये तरतूद आहे   की व्यपाऱ्याचे लायसेन्स नूतनीकरण करतेवेळी शेतकऱ्याची थकबाकी ,बाजार समितीचे सेस पूर्ण दिलेले असावेत   मात्र   या घटनांमुळे असे दिसून येत आहे कि उप सचिवांनी व्यपाऱ्याची थकबाकी असून सुद्धा लाइसेंन्सचे नूतनीकरण केले आहे अशा बऱ्याच घटना बाजार आवारात सुरु आहेत त्यामुळे आता यावर सचिव राजेश भुसारी काय कारवाई करणार याकडे बाजार घटकांचं लक्ष लागलं आहे.