पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना बदलण्यास APMCवर शासन नियुक्त संचालकांची परिस्थिती “न घर का न घाट का”
नवी मुंबई : दोन दिवसांपूर्वी राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये सिल्लोड मतदारसंघातुन शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी चौथ्यांदा   2 हजार 420 मतांनी विजय मिळवला आहे.
मात्र यावेळी पणन मंत्री अब्दुल सत्तारांना मंत्रिपद मिळणार नसल्याची चर्चा बाजार आवारात सुरू आहे, त्यामुळे शासन नियुक्त संचालक व Apmc संचालक मंडळाची धाकधूक वाढली आहे. सत्तारांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर मुंबई APMC वर शासन नियुक्त संचालकांची नियुक्ती केल्याची चर्चा आहे.
पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात मुंबई Apmc सह 307   बाजार समितीत कुठलेही धोरणात्मक निर्णय आणि विकासकामे झालेली नाहीत. मुंबई Apmc मार्केटमधील दौऱ्यानंतर सत्तारांनी 100 दिवसात मार्केटची विकासकामे मार्गी लागतील असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही मार्केटमध्ये विकासकामे झालेली नाहीत. तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावरच पणन मंत्री अब्दुल सत्तर यांच्यामुळे राज्यातील बाजार समितीच्या संचालकांनी पुण्यात उद्रेक केला होता ज्यामुळे सरकारची प्रतिमा खराब झाली होती.
त्यामुळे महायुतीच्या टॅग लाइनवर पणन मंत्री अब्दुल सत्तार फिट बसत नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सर्वात महत्वाची बाब अशी की, राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार बदलल्यास मुंबई एपीएमसीवर नियुक्त असलेले शासन नियुक्त   संचालक घरी जाणार का? अशी चर्चा देखील बाजार आवारात सुरु आहे.