मुंबई Apmcतील पदपथांवर स्टॉल धारकाची कब्जा - कारवाईकडे Apmc प्रशासनचा काणाडोळा, सुरक्ष्याच्या तीनतेरा
मार्केटमधे उघडपणे पदपथावर सिलिंडरचा वापर
-१५ वर्षापासून स्टॉल धरकाकडून नवीन भाडे वाढ नाही ,या नुकसानाची जबावदार कोण
-पाचही मार्केट मधे जवळपास २५० स्टॉल धारक आहे
-जवळपास ८० टक्के स्टॉल धारकणी आपल्या स्टॉल विक्री केला आहे
-माजी संचालक ,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईक यांची स्टॉल असून सर्व स्टॉल धरकांनी वाढीव जागे वापरून भाडेतत्वावर दिले आहे
-बाजार समिती मधे व्यापारी कोट्यवधी रुपये सेस भरतात मात्र त्यांना सुविधा नाही ,
-स्टॉल धारकाकडून भाडे नाममात्र परंतु याना सुविधा व्यापाऱ्यांपेक्षा जास्त
आमदानी आठनी खर्च रुपये अशी चित्र सद्या बाजारसमिती मधे दिसतात
अवैध बांधकामासाठी स्टॉल धारक सोवत मार्केट अभियंता व कार्यकारी अभियंताच्या अर्थपूर्ण सहयोग
बाजार घटकासाठी चालण्यासाठी निर्माण केलेले फुटपाथ गायब
कार्यकारी अभियंता व मालमत्ता विभागाच्या भोंगळ कारभार मुळे मार्केटमधे वाहतूक कोंडी
नवी मुंबई : मुंबई Apmc बजारघटकाना विनाअडथळा आणि सुरक्षितपणे इच्छित स्थळी जाता यावे,आणि वाहतूक सुरळीतपणे यावे   यासाठी Apmc प्रशासनने कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांच्या कडेला पदपथ तयार केले आहेत. मात्र हेच पदपथ मालमता विभाग आणि अभियंत्यांच्या आशीर्वादाने स्टॉल धारक व फेरीवाल्यांसाठी व्यवसाय करण्याचे हक्काचे ठिकाण बनले आहेत. या स्टॉल धारकावर कारवाई करण्यास Apmc प्रशासनकडून टाळाटाळ होत असल्याने, बाजार समिती मधील   जवळपास सर्वच पदपथांवर स्टॉल धरकानी ठिय्या मांडला आहे. त्यामुळे सर्वसामान्य पादचारी आणि वाहतूक दारांना पदपथावरून मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले आहे.
मुंबई Apmc प्रशासनाने धान्य मार्केटमधे रस्ते बांधणीसह नवीन पदपथ तयार करणे व जुन्या पदपथांची दुरुस्ती यांवर जवळपास ६ कोटी रुपये खर्च केले .मार्केटमधे वाहतूक सुरळीत व्हावी आणि पादचाऱ्यांना चालण्याच्या उद्देशाने ही सुविधा निर्माण केली असली, तरी सद्यस्थितीमध्ये मार्केटमधे ९० टक्के पदपथांचा वापर पादचाऱ्यांना चालण्यासाठी करता येत नाही तसेच वाहतूक कोंडी मोठी समस्या बनले आहेत.
आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की झालेल्या कामामध्ये कश्या   प्रकारे अवैध बांधकाम करुन स्टॉल टाकण्यात येत आहे. धान्य मार्केटमधे या स्टॉल धारकाकडून ज्यावेळी काम केला जात होता त्यावेळी Apmc news digital ने बातमी दाखवली होती त्यानंतर मार्केट संचालक निलेश बिरा   यांनी दखल घेतली असून मार्केटमधे फुटपाथवर झालेले   बांधकाम त्वरित काढावे   आणि संबंधित अधिकारी व स्टॉल धारक कडून झालेल्या नुकसानाची भरपाई करावी अशी पत्र मुंबई Apmc सचिवांना दिली,बिरा यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला आहे   की A,B,C,D या विंग च्या फुटपाथवर लाखो रुपये खर्च करुन व्यापारी,माथाडी कामगार आणि ग्राहकासाठी नवीन पदपथाची कामे करण्यात   आली मात्र या पदपथावर स्टॉल धारकांनी   अवैध बांधकाम करुन स्टॉल टाकली आहेत यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे आणि मार्केटमधे अपघात होत आहेत   ,नवीन पदपथावर बांधकाम केल्याने झालेल्या काम बदल माहिती मिळणार नाही त्यामुळे प्रशासनाच्या लाखो रुपयांची मालमत्ता चे नुकसान झाली आहे यावर लवकरात लवकर कारवाई करावी. पत्र देऊन तब्ब्ल १ महिन्याचा कालावधी उलटला पण अजून कारवाई नाहीच. 
मुंबई Apmc धान्य मार्केट मधे जवळपास १००० व्यापारी आणि दलाल ,माथाडी कामगार ,ग्राहक असे एकूण दिवसात १० ते २० हजार लोकांची ये जा असते   मार्केटमध्ये ५ वर्षापासून विकास कामे झाला नव्हता ,त्यासाठी व्यापाऱ्याने सतत आंदोलन केले आणि प्रशासन ने जवळपास ६ कोटी रुपये निविदा काढून रस्ते ,गटार आणि फुटपाथ कामे काढले सध्या काम सुरु असताना फुटपाथ वर स्टॉल धारकाने अवैध पक्के बांधकाम केले आहे आणि यावर स्वतःचा   स्टॉल टाकला   आहे.   धान्य मार्केट सह पाचहि मार्केटमध्ये हीच परिस्तिथी पाहायला मिळते. फुटपाथवर   उघडपणे सिलेंडरचा वापर त्याचबरोबर   गेल्या १५ वर्षांपासून भाडे आणि अग्रेमेन्ट वाढवली नाही. ज्या व्यवसाय साठी स्टाल   देण्यात आला होता त्यासाठी वापर न करता त्या स्टॉलमध्ये   वेगळा व्यवसाय सुरु , या मध्ये ८० टक्के मूळ मालक नसून स्टॉल भाडेतत्वावर दिले आहे. देण्यात आलेल्या जागा वाढवून त्या जागेमध्ये २ ते ३ व्यवसाय सुरु आहेत. बाजार समिती प्रशासन या स्टॉल धारकाकांकडून नाममात्र भाडे वसुली करतात आणि स्टाल धारक भाडे तत्त्वावर   देऊन२० हजार ते ७० हजार   रुपये भाडे वसुली करतात. बाजार समितीला भाडे २   ते ५ हजार पर्यंत मिळतात . यावर पणन संचालक काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मालमत्ता विभाग ,कार्यकारी अभियंता व मार्केट   अभियंताच्या आशिर्वादाने या फुटपाथवर बाजार समितीच्या मालमताचे नुकसान करुन स्टॉल टाकण्यासाठी बांधकाम केली आहे . या अगोदर पण काही स्टॉल धरकानी बांधकाम केली आहे या अवैध बांधकामासाठी स्टॉल धारक सोवत मार्केट अभियंता व कार्यकारी अभियंताच्या अर्थपूर्ण सहयोग मुळे लोकांना चालण्यासाठी निर्माण केलेले फुटपाथ गायब झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सचिव राजेश भुसारी यांनी मुख्यालयात बैठक   घेऊन मालमत्ता बिभाग ,सर्व उप   अभियंता आणि उप सचिवांना पत्र   देण्यात आली मात्र ते कचरा कुंडीत टाकून   काही अभियंता बिनधास्त झाली आहे त्यामुळे या बैठकीत काही तोडगा निघाला   नसल्याने सदर बैठक   निष्फळ ठरलेली दिसून येत आहे. संचालकाच्या पत्रावर कारवाई न करता   सचिव गप्प का ? झालेल्या नुकसानची भरपाई कोण करणार.   यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांना   पाठिंबा का देण्यात येत आहे अशी चर्चा बाजार आवारत सुरु आहे.