मुंबई APMC बाजारपेठेवर चढलाय होळीचा रंग, खरेदीही जोरात
 
- दुकाने सजली ,भारतीय बनावटीचे रंग, पिचकाऱ्यांना मागणी
- होळीच्या खरेदीसाठी मुंबई मधील अनेक भागातून ग्राहक खरेदीसाठी येत आहेत
- ग्राहकांना प्रत्येक वस्तूंच्या दरांमध्ये १० टक्क्यांनी वाढ
नवी मुंबई : अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या होळी सणासाठी साठी मुंबई APMC मार्केट परिसरात होळीचा बाजार सजला आहे. यंदा होळीच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बाजारपेठेत उत्साह आहे. होळीच्या खरेदीसाठी मुंबई मधील अनेक भागातून ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. परंतु   होळीची खरेदी करताना महागाईचे चटके ग्राहकांना प्रत्येक वस्तूंच्या दरांमध्ये १० टक्क्यांनी वाढ दिसून येतं आहे. होळीसाठी लागणाऱ्या वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. हलव्याचे हार, कडे, नारळ, गवऱ्या, रांगोळी, नैसर्गिक रित्या बनवलेले रंग, लहान मुलांसाठी रंगाच्या पिचकाऱ्या अशा विविध प्रकारच्या वस्तू विक्रीस आल्या आहे.