मुंबई APMC संचालक मंडळाचा कार्यकाळ धोक्यात ?
मुंबई Apmcमध्ये शेतकरी प्रतिनिधिंना पाठवणाऱ्या त्या त्या भागातील आमदारांचा   विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने आता संचालक मंडळाला वाली कोण ?
नवी मुंबई : माजलगांव तालुक्यातून   उचलून आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई   Apmc   सभापती पदावर अशोक डक यांना बसवण्यासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत्यांकडे शिफारस करणारे माजलगावाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंकी यांच्या विरोधात अशोक डक यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरला आणि विरोधकांचा प्रचार केला त्यामुळे सोळंकी थोडक्यात वाचले. यासर्व गोष्टी सोळंकींनी अजित दादांना सांगितल्या असून येणाऱ्या काळात मुंबई Apmc काळजीवाहू सभापती अशोक डक यांच्यासह बाकी संचालकांचे पद धोक्यात आल्याचे बोलले जात आहे .
संचालक मंडळ धोक्यात येण्याचे कारण काय ?
राज्याच्या ६ महसूल विभागातून   १२ शेतकरी प्रतिनिधी, १ कामगार प्रतिनिधी, ५ व्यापारी प्रतिनिधी व ५ शासन नियुक्त प्रतिनिधी मुंबई Apmcचे   सदस्य   आहेत .
विदर्भ -मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामधून   आलेले शेतकरी प्रतिनिधी हुकूमचंद आमदारे,सुधीर कोठारी ,प्रवीण देशमुख , माधवराव जाधव ,वैज्यनाथ शिंदे ,धनंजय वाडकर ,अशोक डक, बाळासाहेब सोलसकर नाशिक विभागातून जयदत्त होळकर कोकण मधून प्रभू पाटील ,तसेच ऐन निवडणुक काळात पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी नियुक्ती केलेले शासन नियुक्त संचालक दिलावर मिर्झा बेग ,सतीश ताठे,सांडू गुलसर तडवी ,मीना महारू राठोड ,शिल्पा शिवाजी पाटील या शेतकरी प्रतिनिधिंना मुंबई Apmc संचालक पदावर   बसवणाऱ्या बऱ्याच आमदारांचा पराभव झाला आहे .सर्वात महत्वाचे बाब अशी आहे की पणन मंत्री अब्दुल सत्तार केवळ हजार मतांनी निवडून आले. तर काही शेतकरी प्रतिनिधिंनी   विरोधात भूमिका घेतल्याने त्या भागचे आमदार पराभूत झाल्याची चर्चा त्या त्या भागात सुरू आहे. मात्र आमदारांचाच पराभव झाल्याने या शेतकरी प्रतिनिधिंनी परिस्थिती “ना घर का ना घाट का" अशी पाहायला मिळणार आहे .
मागील ४ वर्षांपासून या शेतकरी प्रतिनिधिंनी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय न घेता, केवळ स्वतःसाठी आर्थिक फायदा करून घेत त्यांनी व्यापारी प्रतिनिनिधिंना हाताशी धरून शेतकऱ्यांना हद्दपार करण्याची कामे केल्याचे   बोलले जात आहे . 
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की, हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे.   परंतु, आशिया खंडातील मोठी बाजार समिती मुंबई Apmc मधून शेतकरी व प्रामाणिक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना   हद्दपार केले जात आहे व यामागे शेतकरी प्रतिनिधी व व्यापारी प्रतिनिधी यांचा मोठा वाटा आहे. ही बाब आता समोर आल्यावर आपली खुर्ची वाचवण्यासाठी काळजीबाहू सभापतींपासून अनेक शेतकरी व व्यापारी प्रतिनिधींनी नव निर्वाचित आमदारांना भेटीसाठी फिल्डिंग लावली आहे . त्यामुळे आता   नवीन सरकारमधून येणारे मंत्री व आमदार या शेतकरी विरोधी काम करणाऱ्या प्रतिनिधींना सहकार्य करणार, की घरचा रस्ता दाखवणार? याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष लागले आहे .