ठाकरे गट कोंडीत तर शिंदे गट ॲक्शन मोड वर
मुंबई : दररोज नवनवीन बातम्या कानावर पडत असतात. महाराष्ट्राच्या जनतेच लक्ष सध्याच्या   राजकारणावर आहे.   राज्यातील सत्तासंघर्ष कधी स्थीर होई याची कल्पना कुणी करूच नाही शकत. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर ठाकरेंनी शिवसेना भवनात एंट्री करताच संपुर्ण परिसर घोषणांनी दणाणला 
शिवसेना पदाधिकाऱ्यांचा   १८ जून रोजी मुंबईत भव्य मेळावा आणि जिल्हा प्रमुखांच्या शंकांचं निरसन होणार असल्याची शाश्वती या बैठकीत दिली. पण बैठकीपुर्वीच पुण्यात वार फिरलं पुणे जिल्हाप्रमुखानी ठाकरे गटावरच   आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला. पुण्याचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिंदे गटात उडी मारलीये. महेश पासलकर यांचा दौंड तालुक्यात प्रभाव आहे . अशातच ठाकरे गटाला बाजूला करून शिंदे गटाला पासलकरांनी जवळ केलंय. ठाकरे गट एक एक शिवसैनिकांना जवळ करतोय पण दुसऱ्या बाजूला शिंदे गट ठाकरे गटाची माणस आपल्याकडे खेचू पाहतोय.