मुंबई APMC होलसेल मार्केटमध्ये कांदा, बटाटा,लसणाची आजचे आवक आणि दर ०१/०१/२०२४
Mumbai Apmc Onion Market rates Today: मुंबई APMC होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज १३२ गाड्याची आवक झाली आहे . कांद्याच्या ७२ गाड्यांमधून जवळपास १४ हजार ६०४ गोनी कांद्याची आवक झाली आहे. मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचा दर १५ ते २४ रुपये आहे, नवीन कांद्याचा दर १४ ते २४ रुपये आहे,तसेच गोलटा कांद्याचा दर १० ते १५ रुपये आहे. मार्केटमध्ये बटाट्याच्या ५० गाड्यांमधून २० हजार   गोनी बटाट्याची आवक झाली आहे. मार्केटमध्ये UPहून आलेल्या जुन्या बटाट्याचा दर ११ ते १६ रुपये आहे, मध्य प्रदेश मधून आलेल्या जुन्या बटाट्याचा दर १० ते १७ रुपये आहे, तर महाराष्ट्रातील तलेगावहून आलेल्या बटाट्याचा दर १० ते १७ रुपये व पंजाबमधून आलेल्या बटाट्याचा दर १० ते १२ रुपये प्रतिकिलोने बिक्री झाली आहे. मार्केटमध्ये आज लसणाच्या ११ गाड्यांमधून २५५० गोणी लासणाची आवक झाली आहे. मार्केटमध्ये उटीहून आलेल्या लसणाचा दर १६०   ते २४० रुपये आहे. तर देशी लसणाचा दर १२० ते १९० रुपये व गुजरात व up हून आलेल्या लसणाचा दर १२० ते १५० रुपये आहे . तर परदेशी चायनाहून आलेल्या लसनाचा दर १७० ते १९०   रुपये प्रतिकिलो आहे.