मुंबई APMC घाऊक बाजारात आवक कमी असल्याने भाजीपाला दरांत वाढ
मुंबई Apmc घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे..राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या फटाक्यामुळे त्याचप्रमाणे वाढत्या उन्हाची तीव्रता आणि सिंचनासाठी पाण्याची भासणारी टंचाईमुळे पालेभाज्यांची लागवड कमी झाली आहे. त्यामुळे एपीएमसीतील भाजी बाजारात आवक कमी होत असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात १० ते २० टक्के वाढ झाली आहे.
कोथिंबिरीला दर्जानुसार गेल्या काही महिन्यांपासून १ ते ३० रुपये प्रति जुडी असे दर मिळत होते. ते आता २० ते ५७ रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्याचप्रमाणे मेथी २५ ते ४० रुपये प्रतिजुडी ,शेपू १२ ते २७, कांदापात ८ ते २४, भोपळा २५ ते ३० रुपये, शिमला ३५ ते ४०   रुपये   किलो दराने विक्री केला जात आहे..   तसेच मटारचा भावात १० ते १५ रुपयांची वाढ होऊन ५५ ते ७० रुपये दरात विक्री होत आहे , भेंडी ४० ते ४५ ,गवार ५५ ते ६० रुपये किलोच्या दरात   विक्री होत आहे .. बाजारात   कोबीचा दर ८ ते १० रुपये किलो आहे , फ्लॉवर १५ रुपये, टोमॅटो १५ ते १८ रुपये, मिरची ३५ ते ५० रुपयांनी   विक्री होत आहे..