मुंबई Apmc भाजीपाला मार्केटमधे टेम्पो शिकत असताना भिंतीला दिली धडक संरक्षण भिंत कोसळली, अनर्थ होता होता टळला, नेमकं काय घडलं?
मार्केट संचालक आणी सुरक्ष्या अधिकाऱ्याचे संगनमताने बाजार आवारत अनधिकृत खाली वाहनाची   पार्किंग
पार्किंग मुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात
मार्केट संचालक आपला   फायदासाठी बाजार घटकाची जीवाशी खेळतात का ?
नवी मुंबई :मुंबई Apmc भाजीपाला मार्केटमधे रात्री ८ च्या सुमारास टेम्पोने   धडक दिल्याने   संऱक्षक भिंत कोसळलेय. भाजीपाला मार्केटमध्ये टेम्पो चालक   शिकत असल्याने   हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे . रविवार असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही   तसंच प्रशासनानं याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी बाजारघटकानी केलीये.  
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील सुटीच्या दिवशी सुरक्ष्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे एका टेम्पोने   भाजीपाला आणि फळ मार्केटच्या भींतीला   जोरदार धक्का दिला आणि भिंत कोसळली. सुदैवाने सुटीच्या दिवसामुळे जिवितहानी टळली नाही तर ज्या ठिकाणी अपघात झाला   त्याठिकाणी मोठा   प्रमाणात गर्दी असते.
प्रशासनाच्या नियमानुसार रात्रीच्या वेळी शेतमाल घेयून येणाऱ्या गाडयांना मार्केट मध्ये पार्किंग ची व्यवस्था आहे पण खाली गाडयांना मार्केट मध्ये प्रवेश नाही परंतु रात्रीच्या वेळी माल नसलेल्या   वाहनांना पार्किंग करण्यासाठी प्रत्येक गाड्या धारकाकडून ५० ते १०० रुपये सुरक्षा अधिकाऱ्याकडून घेतला जातो.   त्या वाहन धारकांकडून सुरक्षा अधिकारी पैसे वसुली करतात त्यामुळेच मार्केटमधील मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मार्केटमधील फुटपाथववर स्टॉल धारकांचे अतिक्रमण ,   मार्केटमध्ये   शेकडो रिक्षा प्रवेश करतात , धक्क्यावर आणि पॅसेजवर   अनधिकृतपणे शेतमाल विक्रीमुळे   ग्राहक ,व्यापारी आणि माथाडी कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागतो या सर्व समस्यांवर   संचालक गप्प का ? मार्केट संचालक आपल्या   फायद्यासाठी   बाजार घटकाच्या   जीवाशी खेळतात का ?अशी चर्चा बाजार आवारत होत आहे .