राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष कोण होणार? ही समिती घेणार निर्णय
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले असल्याचे बोलले जात आहे. परंतु त्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल, असा धक्कादायक निर्णय शरद पवार यांनी जाहीर केला. आपण अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्त्यांकडून मोठा दबाब आणला जात आहे.
सततचा प्रवास माझा जीवनाचा भाग झाला आहे. जनतेचे प्रेम, जनतेचा विश्वास हाच माझा प्राण आहे. गेली २४ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मी काम करत आहे. गेली ५६ वर्षे सत्तेच्या राजकारणात मी आहे. आता मी निवडणुकीला उभा राहणार नाही. तसेच मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. प्रदीर्घ कालावधीनंतर कुठेतरी थांबण्याचा निर्णय घेतला पाहिजे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मी घेतला आहे. आता शेती, शेतकरी, कामगार व समाजातील सर्व घटकांकडे अधिक लक्ष देण्याची भूमिका मी घेतलीय. मी राजकारणात कायम राहणार आहे.
ही असणार समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची समिती नेमण्याची सूचना केली. या समितीत राज्यातील पक्षाचे नेते व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचा समावेश केला आहे. समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनील देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच फौजिया खान, अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, धीरज शर्मा, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सोनिया दूहन, अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांचा समावेश असणार आहे.
मी काँग्रेसचा सदस्य झालो
मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झाला. हळहळू मी पुण्यात काम केले. त्यानंतर मला मुंबईत काम करायचे सांगितले. मग   महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांशी संपर्क येत होते. त्यावेळी अनेक मोठे नेते हॉटेलमध्ये उतरत नव्हते तर पक्षाच्या कार्यालयात किंवा कार्यकर्त्यांच्या घरी उतरत होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यांशी संपर्क आला. मग गेली अनेक वर्षे राजकारणात विविध पदे भूषवित आहे.