राज्यात राजकीय भूकंप होणार? अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासारखंचं करणार? राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन करेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता अजित पवार यांच्यासोबत 53 पैकी 40 आमदार असल्याचं एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तांत म्हटले आहे. त्यावरून संपूर्ण राज्यात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल काही दिवसांमध्येच लागेल असे चित्र आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्यावरूनच राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदार आहेत. असं वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. योग्यवेळ आल्यावर 40 आमदारांच्या पाठिंब्याची यादी अजित पवार राज्यपालांना देणार असल्याचेही त्यामध्ये म्हंटले आहे.
यामध्ये अजित पवार यांनी 40 आमदारांना वैयक्तिकरित्या संपर्क साधल्याचे समोर आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी अजितदादांनी शपथ घेतल्यास सरकर पडण्याची वेळ येणार नाही असंही त्या वृत्तात म्हंटलं गेलं आहे.
2019 ला राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट घेऊन अजित पवार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. यामध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद ही देण्यात आलं होतं. याशिवाय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होता.