मुंबई APMC मधील कित्येक वर्षापासून रखडलेले अनुकंपा पदभरती तिढा सुटला 36 अनुकंपा धारकांना मिळाली नियुक्ती पत्र
काही दानचालकांची “अर्थपूर्ण “हितसंबधामुळे अनुकंपा व पदोन्नती रखडल्याची चर्चा
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधे बऱ्याच वर्षापासून   रेंगाळत पडलेल्या अनुकंपा पदभरतीचा अखेर तिढा सुटला आहे. 11 ऑक्टोबर रोजी मुंबई Apmc सचिव डॉक्टर पी .एल   खंडागले यांनी बाजार समितीच्या आस्थापनामध्ये ३६ अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेतले आहे.
मुंबई एपीएमसी मधे मागील कित्येक वर्षापासून   अनुकंपा नियुक्त्या रखडलेल्या होत्या. अनुकंपा पदभरती तत्काळ करण्यात यावी, यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी व कर्मचारी संघाने   वेळोवेळी पाठपुरावा करत होते ,दोन महिन्यापूर्वी संचालक मंडळाची बैठक सुरू असताना सभागृहाचा बाहेर अनुकंपा   व पदोन्नती धारकानी गेटवर आंदोलन करून एका संचालकाला घेराव घातला , आणि त्या नंतर संचालक मंडळाने आश्वासन दिले होते की लवकरात लवकर भर्ती करण्यात येईल .त्या आंदोलनामुळे अखेर यश मिळाली आहे.
शासनसेवेत रुजू असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या जागेवर एका वारसाला नोकरीत सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, संचालक मंडळाचा   उदासीन धोरणामुळे अनुकंपा पदभरती करण्यासाठी दिरंगाई केली जात होते . ज्यावेळी संचालकाना   घेराव घातला त्यावेळी याची दखल घेऊन संचालक मंडळाने ठराव केला आणि पणन   संचालककडे पाठवले. पणन संचालकाची मंजुरी नंतर आज सचिव खंडागले यांनी ३६ अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेतले आहे. यामधे १२ शिपाई व २४ लिपिक समावेश आहे . अनुकंपा कर्मचाऱ्यांना बाजार समितीमधील नोकरी मिळाल्याने सर्वांनी पेढे वाटून जल्लोष साजर केला .दुसरी बाब अशी आहे की   मागील ४ वर्षपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पदोन्नती सुद्धा रखडलेले आहे .या पदोन्नतीच्या वाट पाहून काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले   आहे .पदोन्नती व अनुकंपा धारकाकडून काही संचालकाची अर्थपूर्ण हितसंबंधामुळे मागील ४ वर्षापासून रखडल्याची बोलले जात आहे .या सर्वाने ज्यावेळी सभागृहात संचालकांची घेराव घातला तर सर्वाने ठराव करून मंजूर केल्याची चर्चा बाजार आवरत सुरू आहे .अनुकंपा धारकांची नियुक्ती मिळाली आता अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पदोन्नती सुद्धा लवकरात लवकर करण्यात येईल अशी माहिती सचिव डॉक्टर .पी .एल खंडागले यांनी दिली आहे .