Yellow Watermelon Farmer Success Story | युवा शेतकऱ्यानं केली पिवळ्या कलिंगडाची लागवड, शहरी भागात मोठी मागणी
नवी मुंबई : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील शेतकरी युवा शेतकरी संजय रोडे यांनी पिवळ्या कलिंगडाची लागवड (Cultivation Watermelon) करत चांगलं उत्पन्न घेतलंय.काही शेतकऱ्यांचा   नेहमीच पारंपारिक पीक सोडून वेगळं काही करण्याकडे कल असतो असाच आगळा-वेगळा प्रयोग केलाय   अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील एका युवा शेतकऱ्यानं.गोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील युवा शेतकरी संजय रोडे यांनी. संजय यांनी पिवळ्या रंगाच्या विशाला या जातीच्या कलिंगडाची लागवड केली आहे.   कलिंगड दिसायला वेगळं असल्यानं याला जास्त दर मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानं त्यांना यातून शाश्वत दर मिळाला आहे.बर ते एवढ्यावर थांबले नाही त्यांनी या कलिंगडासोबत त्यांनी आणखी दोन जातीच्या कलिंगडाचीही लागवड केली आहे.