रेल्वेस्थानकावर पाणी पिताना सावधान, कारण कचऱ्याच्या बाटल्समध्ये पाणी भरून…
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर अशुद्ध पाणी विक्री केली जात असल्याची बाब समोर आली. त्यामुळे तिथल्या विक्रेत्यांकडून बाटल्समधील पाणी खरेदी करत असाल तर सावधान. कारण या ठिकाणी काही लोकं अशुद्ध पाणी विक्री करतात. कचरावाल्याकडून खराब बाटल्स घेतात. त्यानंतर त्यात अशुद्ध पाणी भरून रेल्वेस्थाक परिसरात विकतात. यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तुम्ही अशा बाटल्स खरेदी करून पाणी पित असाल तर सावध असलेले बरे.
प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ
नागपूर आरपीएफने अशुद्ध पाणी विकणाऱ्याला अटक केली. कचऱ्यातील बाटलमध्ये अशुद्ध पाणी भरत होते. रेल्वे प्रवाशांना अशुद्ध पाणी विकले जात होते. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता. इरफान असलम कुरेशी असं अटकेतील आरोपीचं नाव आहे.
ड्रममधील पाणी कचऱ्याच्या बाटल्समध्ये
रेल्वेट्रॅकला लागून असलेल्या परिसरात आरपीएफ गस्त घालत होते. आरपीएफला झुडपांमध्ये एका ड्रममध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या पाण्याची बाटल्स मिळून आल्यात. दरम्यान, याच परिसरात एक ड्रम जमिनीवर फेकताना एक व्यक्ती दिसून आला. त्याचा पाठलाग करत त्याला अटक केली.
अशुद्ध पाणी १५ ते २० रुपयांत
तसेच आरपीएफने त्या परिसराची पाहणी केली. तेव्हा रिकाम्या बाटल्स आणि सील करण्यासाठीचे बाटल्सचे झाकण मिळून आले. यामध्ये आरोपी हा कचरा विकणाऱ्यापासून बाटल्स विकत घेतो. अशुद्ध पाणी भरून 15 ते 20 रुपये दराने ते विक्री करतो, अशी बाब पुढं आली. यात आरोपीच्या साथीदाराचा शोध घेत आहेत. पुढील तपास आरपीएफ करत आहे.
बोगस लेबल लावून विक्री
घरून निघण्यापूर्वी प्रवाशांनी पाणी घेऊन जाते गरजेचे आहे. कारण बाहेर मिळणारे पाणी शुद्ध असेल याची काही शास्वती नाही. बोगस लेबल लावून अशुद्ध पाणी विक्री करणारी मोठी टोळी सक्रिय आहे. प्रशासन कारवाई करण्यासाठी तोकडे पडत आहे.