शेतकऱ्यांचा राग अनावर टोमॅटो विकण्याऐवजी रस्त्यावर फेकले
नाशिक : शेतकऱ्यांची   तळमळ कोणता नेता समजून घेऊन शेतकऱ्याच्या समस्येवर तोडगा काढेल हा प्रश्न सर्वनाच पडलाय. अन्न शिजवणं सोपं असत पण शेती करण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो हे शेतकऱ्यालाच माहित आहे तरी हि त्याच्या पदरात नेहमी दुःख च का ? 
नाशिक जिल्ह्यात कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे भाव घसरले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह दिंडोरी, कळवण येथे शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले. लाखो रुपये खर्च करूनही टोमॅटो लागवड केली असताना कवडीमोल भाव मिळत आहे.लाल टोमॅटोला प्रति जाळी एक ते तीन रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाले. टोमॅटो फेकल्यानंतर वाहने ही मार्केट यार्डच्या गेटवरच उभी केली होती.२० किलोच्या टोमॅटो कॅरेटला फक्त २० ते ३० रुपये भाव मिळाला आहे. खर्चही न निघाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो विकण्याऐवजी रस्त्यावर फेकून दिले. या परीस्तीत शेतकऱ्याच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरल्याचं पाहायला मिळतंय.