लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव ९०० ते १००० रुपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ
लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव ९०० ते १००० रुपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ
कांद्यानं पुन्हा बळीराजाला रडवलं, काय आहे कारण?
कांदा पीकासाठी झालेला उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी
नाशिक   जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या बाजार   मागील दोन आठवड्यापासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. अंदरसुल बाजार समितीत कालच्या बाजारभावाची स्थिती पाहता हजार रुपयांच्या आतमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कांदा पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रडवू लागला आहे. लाल कांद्याचे भाव सरासरी 900 रुपयांपर्यंत आले आहेत. त्यामध्ये किमान बाजारभाव 200 ते जास्तीत जास्त 1200 रुपयांपर्यंत भाव आले आहेत.
लाल कांदा हा साठवू शकत नाही. लाल कांदा हा टिकाऊ नसतो. त्याला लगचेच मोड येण्यास सुरुवात होते. याशिवाय खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उन्हाळ कांद्यासारखा लाल कांदा साठवता येत नाही. त्याचा एक फटका शेतकऱ्यांना बसतोय.
देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा होत आहे, तसेच विदेशात निर्यातीला ही अपेक्षित मागणी नसल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज 800 वाहनातून 16 हजार 200 क्विंटल लाल कांदा विक्रीसाठी दाखल झाला आहे. या कांद्याला जास्तीत जास्त 1380 रुपये, कमीतकमी 500 रुपये तर सरासरी 960 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव जरी मिळताना दिसत असेल मात्र सरासरी 600 ते 800 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळत आहे.