नाशिक APMCच्या सभापतीपदी देविदास पिंगळे, उपसभापतीपदी उत्तम खांडबहाले
 
 
नाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची (Nashik APMC) निवडणूक प्रक्रिया २८ एप्रिल रोजी पार पडून २९ एप्रिल रोजी निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक कधी होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यानंतर अखेर आज बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे...
निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी नितिनकुमार मुंडावरे (Nitin Kumar Mundaware) यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या आवारातील सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सभापतीपदासाठी देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांचा तर उपसभापतीपदासाठी उत्तम खांडबहाले (Uttam Khandbahale ) यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान, यावेळी बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच कोणताही वाद होऊन नये म्हणून बाजार समितीच्या आवारात पोलिसांचा (Police) चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.