कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
नाशिक :राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार १ फेब्रुवारी ते ३१ मार्चदरम्यान विक्री झालेल्या लेट खरीप कांद्याला प्रतिक्विंटल ३५० रुपये प्रति शेतकरी २०० क्विंटल मर्यादित अनुदान मिळणार आहे.त्यासाठी मंगळवार पासून बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याचे दिसून आले आहे . अखेरच्या दिवशी शुक्रवारी ३१ मार्च   रोजी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी बाजारात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे .जानेवारीच्या अखेरपासून तर मार्च अखेर लेट खरीप कांद्याच्या दरात अपेक्षित सुधारणा दिसून आलेली नाही त्यामुळे उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे.त्यातच जिल्ह्यात वादळी वारे, गारपीट झाल्याने लेट खरीप कांद्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे काढलेला कांदा विक्री करून अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, चांदवड, नांदगाव, उमराणे येथे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गर्दी केली.
सरासरी ६५० ते १००० रुपये दररामनवमीच्या दिवशी काही बाजार समितीचे कामकाज बंद होते. तर मार्च अखेर सर्वच बाजार समिती कांदा लिलाव सुरू ठेवले होते. शुक्रवारी (ता.३१) सरासरी ६५० ते १००० रुपयांपर्यंत दर मिळाले.