Onion: कांद्याला खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती देते जास्त भाव, कांदे विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
नाशिक: धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला भाव नाही. आवक कमी झाली असताना दुसरीकडे मात्र खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला चांगला भाव आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदे विक्रीसाठी शेतकरी येऊ लागले आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यातून तो शेतकरी सावरतो ना सावरतो तेवढ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला दर नाहीत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 100 रुपयांपासून 900 रुपयांपर्यंत कांद्याला दर आहेत.
खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती 300 रुपयापासून अकराशे रुपयापर्यंत कांद्याला दर दिला जात आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत साधारण दोन ते अडीच हजार क्विंटल कांद्याची आवक होते आहे. दुसरीकडे खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत याच कांद्याची आवक दहा ते बारा हजार क्विंटल होत आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी नेतात. त्यानंतर तोलाई, मोजाई , हमाली, गोणीचे दर यामुळे शेतकऱ्यांना धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री करणे परवडत नाही. त्यामुळे शेतकरी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वळला आहे. खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र कुठल्याही पद्धतीने तोलाई, मोजाई, हमाली हे लागत नाही.