बाजार समितीचा राजकीय आखाडा तापला, निवडणुकीच्या मैदानात तरुणांचे सर्वाधिक अर्ज, कोण मारणार बाजी?
नाशिक: राज्यातील बाजार समितीचे निवडणुकीचे बिगूल काही दिवसांपूर्वी वाजले होते. त्यामुळे सोमवार पर्यन्त अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू होती. अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये तरुणांनी सर्वाधिक अर्ज भरले असल्याने बाजार समितीच्या निवडणुकीत यानिमित्ताने रंगत येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. नशिक जिल्ह्यात तब्बल 14 बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी यंदाच्या वर्षी पाहायला मिळत आहे. यामध्ये तब्बल 2 हजार 421 अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे माघारी नंतर उमेदवार कोण असणार असं चित्र स्पष्ट होत असलं तरी अर्ज दाखल करण्यात आलेल्यांची संख्या पाहता मोठी धामधूम पाहायला मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांची धामधूम पाहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या मैदानात जवळपास 2 हजार 421 जणांनी अर्ज दाखल केले आहे. त्यातील अनेक अर्ज दाखल करणाऱ्यांनी निवडणूक लढण्यासाठी सज्ज असल्याची तयारी दर्शवली आहे.
खरंतर उद्या म्हणजेच बुधवारी या अर्जाची छाननी होणार आहे. त्यामध्ये अनेक जणांचे अर्ज बाद होणार आहे. तर ज्यांचे अर्ज वैद ठरतील त्यांना माघारीच्या दिवशी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत पाहायला मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सर्वाधिक 309 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. खरंतर बाजार समितीत अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी प्रत्यक्षात किती जन निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
-खरंतर या बाजार समितीच्या निवडणुकी ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्था आणि सोसायटीचे सदस्य यांना मतदानाचा अधिकार असतो. त्यामुळे गावखेड्यातील राजकारण चांगलेच तापले असून या निवडणुकीत अर्थकारण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत असते.
-सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे बाजार समितीची निवडणूक म्हणजे आगामी विधानसभेचा ट्रेलर असतो. आजी माजी आमदार यामध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावत असतात. त्यामुळे बाजार समितीत आपले वर्चस्व कायम निर्माण करण्यासाठी किंवा अबाधित ठेवण्यासाठी राजकीय नेते संपूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जात असतात.
पिंपळगाव बाजार समितीत आजी माजी आमदार यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत असल्याने तिथे सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहे. तर नाशिक बाजार समितीत शिंदेंची शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळत आहे.
याशिवाय चांदवड बाजार समितीत आगामी काळातील इच्छुक उमेदवारांची मनधरणी करत त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मदत करून राजकीय प्रतिस्पर्धी कमी करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
ठिकठिकाणी असाच आजी माजी आमदारांच्या मध्येच बाजार समितीची निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीचा ट्रेलरच एकप्रकारे नाशिकमध्ये पाहायला मिळत असून अंतिम टप्यात कोण निवडणुकीचे मैदान मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.