नवी मुंबईत अपघातात मृत्युमुखीचे प्रमाणात १७.७% घट राज्यात तिसरा क्रमांक
 
मुंबई : आज परिवहन विभागातर्फे राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2024 चा उद्घाटन सोहळा सह्याद्री अतिथीगृह ,मलबार हील मुंबई येथे पार पाडला.
महाराष्ट्र शासनातर्फे मागील वर्षी राज्यात रस्ते अपघात आणि अपघातात मृत्यूमुखी संख्या कमी करण्याचा उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. त्यात राज्यातील जिल्ह्यांमध्ये/विभागामध्ये नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला..
मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा प्रथम आणि चंद्रपूर जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला.
सदर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सार्वजनिक बांधकाम मंत्री   दादाजी भुसे आणि शालेय शिक्षण मंत्री   दीपक केसरकर यांच्या हस्ते नवी मुंबईच्या वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त   तिरुपती काकडे आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी   हेमांगिनी पाटील यांचे सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. नवी मुंबई शहरात   पोलीस विभाग,महानगरपालिका, सिडको, प्रादेशिक परिवहन कार्यालय, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने   रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट (वारंवार अपघात होणारे ) अपघातप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण, तपासणी आणि अभ्यास करून, त्यातील त्रुटी शोधून काढून   आवश्यक ते बदल करून अपघात संख्या कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून नवी मुंबई शहरातील मागील वर्षाच्या तुलनेत अपघाती मृत्युमुखी संख्या ही 17.7%   टक्क्यांनी कमी झाली. आकडेवारी लक्षात घेता नवी मुंबई विभाग हा तिसऱ्या क्रमांकावर येतो.
नवी मुंबई परिसरातील रस्ते अपघात आणि मृत्यू संख्या कमी करण्यामध्ये नवी मुंबईतील पोलीस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम आणि महानगरपालिका या सर्व विभागांनी घेतलेले परिश्रमाचे शासनाने कौतुक केलेले आहे.
सदर कार्यक्रमात परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, परिवहन आयुक्त   विवेक भिमनवार, अतिरिक्त पोलिस महासंचालक   सुखविंदर सिंग व मुंबई वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त   प्रवीण पडवळ हे मान्यवर उपस्थित होते.